गुजरात काँग्रेसचे दोन नेते भाजपच्या वाटेवर; निवडणुकाच्या तोंडावर नेत्यांनी साथ सोडली

गुजरातचे प्रभारी रघू शर्मा आणि पक्षाच्या नेत्यांमध्ये सर्व काही सुरळीत सुरू नसल्याचे सांगण्यात येत आहे. रघु शर्मा आणि काँग्रेस अध्यक्ष जगदीश ठाकोर यांच्यात वादावादी सुरू आहे. माजी मंत्री नरेश रावल आणि राज्यसभा खासदार राजू परमार लवकरच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या अवघ्या चार महिन्यांपूर्वी नेत्यांची साथ सोडल्याने पक्षासमोरील अडचणी वाढणार आहेत.

    अहमदाबाद : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी (Gujarat Election) काँग्रेसला (Congress) आणखी दोन मोठे धक्के बसू शकतात. माजी मंत्री नरेश रावल (Naresh Rawal) आणि राज्यसभा खासदार राजू परमार (Raju Parmar) लवकरच काँग्रेस सोडून भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या अवघ्या चार महिन्यांपूर्वी नेत्यांची साथ सोडल्याने पक्षासमोरील अडचणी वाढणार आहेत.

    गुजरातचे (Gujarat) प्रभारी रघू शर्मा आणि पक्षाच्या नेत्यांमध्ये सर्व काही सुरळीत सुरू नसल्याचे सांगण्यात येत आहे. रघु शर्मा आणि काँग्रेस अध्यक्ष जगदीश ठाकोर यांच्यात वादावादी सुरू आहे. आम आदमी पक्षाने आपल्या १० उमेदवारांची घोषणा केली आहे.

    भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यांद्वारे प्रचाराची तयारी केली असताना काँग्रेसला (Congress) घर सांभाळण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. गुजरातमध्ये काँग्रेसला यापूर्वीही धक्के बसले आहेत. हार्दिक पटेल, जयराजसिंह परमार, केवल जोशियारा, इंद्रनील राजगुरू, श्वेता ब्रह्मभट्ट या नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे.