us terror

जम्मू काश्मीरमधील अवंतीपोरा भागात घातपात करून रक्तपात करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा डाव भारतीय लष्करानं उधळून लावलाय. अवंतीपोरा भागात अल बद्र या दहशतवादी संघटनेचे ४ दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला समजली. त्यानंतर लष्कराने तातडीने आपली मोहिम राबवत या दहशताद्यांना शोधून काढले. मोठ्या शस्त्रसाठ्यासह या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलंय.

गेल्या काही महिन्यांपासून जम्मू आणि काश्मीर परिसरात दहशतवादी कारवाया वाढताना दिसतायत. मात्र भारतीय लष्करानंही आपली सतर्कता वाढवली असून दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्याचा सिलसिला सूरूच ठेवलाय. काश्मीरमध्ये सक्रिय झालेल्या अलबद्र या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातलंय. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दोन दहशतवाद्यांना टिपण्यात भारतीय लष्कराला यश आलंय.

जम्मू काश्मीरमधील अवंतीपोरा भागात घातपात करून रक्तपात करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा डाव भारतीय लष्करानं उधळून लावलाय. अवंतीपोरा भागात अल बद्र या दहशतवादी संघटनेचे ४ दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला समजली. त्यानंतर लष्कराने तातडीने आपली मोहिम राबवत या दहशताद्यांना शोधून काढले. मोठ्या शस्त्रसाठ्यासह या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलंय.

काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला खोऱ्याजवळच्या वनिगाम भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना मिळाली. भल्या पहाटे ही माहिती मिळाल्यानंतर तातडीनं जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीनं शोधमोहिम सुरू करण्यात आली. ही मोहिम सुरू असतानाच लपून बसलेल्या अल बद्रच्या दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या हल्ल्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.

काही वेळ दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू राहिल्यानंतर दहशतवाद्यानी शरणागती पत्करली. भारतीय जवानांपुढे आपला टिकाव लागणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी शरण येण्याचा निर्णय़ घेत स्वतःला भारतीय लष्कराकडे सोपवले. या चौघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी काही दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

या कारवाईत दहशतवाद्यांनी लपवून ठेवलेली शस्त्रं आणि दारुगोळा यांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. त्यात १ एके ५६ रायफल, १ एके ५६ मॅगझिन, २८ बॉम्ब आणि एका हातबॉम्बचा समावेश आहे. याअगोदर १३ डिसेंबरला झालेल्या हल्ल्यात भारतीय जवानांनी २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.