जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवले गेले हे चांगलेच झाले : राकेश टिकैत

जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवणे मोठी गोष्ट होती. आता तेथील समस्या संपुष्टात येतील, असे वाटले होते. मात्र, तसे झाले नाही. अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे स्थानिक नागरिकांचे नुकसान होत आहे, असा दावा राकेश टिकैत यांनी केला आहे.

    नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची बैठक गुरुवारी पार पडली. या सर्वपक्षीय बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यानंतर या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. या बैठकीला जम्मू-काश्मीरमधील १४ पक्षांचे नेते उपस्थित होते. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यानंतर आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी यावर भाष्य केले असून, जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवले गेले हे चांगलेच झाले, असे म्हटले आहे.

    जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवणे मोठी गोष्ट होती. आता तेथील समस्या संपुष्टात येतील, असे वाटले होते. मात्र, तसे झाले नाही. अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे स्थानिक नागरिकांचे नुकसान होत आहे, असा दावा राकेश टिकैत यांनी केला आहे.

    आम्ही जम्मू-काश्मीरच्या जनतेसोबत आहोत. अनुच्छेद ३७० हटवणे ही चांगली बाब असली, तरी त्यामुळे आता स्थानिकांना पॅकेज मिळणे बंद झाले आहे. वीज, वाहतूक यांवर मिळत असलेले अनुदान बंद झाले आहे. जम्मू-काश्मीरच्या स्थानिकांना पूर्वीप्रमाणे पॅकेजस, अनुदान सुरू राहिली पाहिजेत, अशी मागणी करत जनतेचे नुकसान होता कामा नये, असे राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे.