सर्व युवकांना नोकरी देणे अशक्य, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची स्पष्टोक्ती

मुख्यमंत्री सोरेन यांनी रोजगाराच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर टीका करीत स्वत: एकलव्यचे वंशज असल्याचे सांगितले. महाभारत आणि रामायणातही आपण होतोच, परंतु तेथेही आपली उपेक्षाच झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी संमोहन अस्त्र घेऊन बाहेर येतात आणि २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे सांगतात.

    रांची :  झारखंडमध्ये खासगी क्षेत्रात स्थानीक नोकऱ्यांमध्ये युवकांना ७५ टक्के आरक्षण देण्याच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी झारखंडमधील सर्व युवकांना नोकरी देणे शक्य नाही असे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. तथापि सरकार या बेरोजगार युवकांना स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने काम करीत आहे असे सांगत स्वयंरोजगारासाठी सरकार रास्त दरात कर्ज वितरण करण्याची योजना आखत असल्याचे ते म्हणाले.

    मोदी सरकारवर टीकास्त्र

    मुख्यमंत्री सोरेन यांनी रोजगाराच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर टीका करीत स्वत: एकलव्यचे वंशज असल्याचे सांगितले. महाभारत आणि रामायणातही आपण होतोच, परंतु तेथेही आपली उपेक्षाच झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी संमोहन अस्त्र घेऊन बाहेर येतात आणि २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे सांगतात. परंतु त्यांची चतुरस्त्र नीती आपल्याला माहिती आहे. आता तर केंद्रता बसलेले लोकंही शेतकऱ्यांना डोळे दाखवू लागले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

    राज्याचा इतिहास विचित्र आणि रोमांचक

    दरम्यान, एकीकडे विरोधक आहे तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील सहकारी आहेत असे सांगत भाजपावाले माझे मत ऐकतील असे ते म्हणाले. झारखंडचा इतिहास विचित्र आणि रोमांचक आहे असे सांगत झारखंडचे आंदोलन लोकांना शिक्षण, आरोग्य, संस्कृती आणि निवाऱ्यासाठी होते. आतापर्यंतच्या सरकारांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले असे सांगत विकासाच्या बाबतीत मात्र आपण माघारलो आहोत असे ते म्हणाले.