पीएम मोदींच्या बैठकीच्या पूर्वसंध्येलाच काश्मीर खोऱ्यात दहशवादी सक्रीय झाल्याची माहिती ; एकाच दिवसांत तीन हल्ले

जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर होत असलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी सक्रीय झाले असून, काश्मीर खोऱ्यात तीन ठिकाणी सुरक्षादलांवर हल्ले केले आहेत. एकाच दिवशी हे तीनही हल्ले झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी पुलवामा येथील नाकाबंदी केलेल्या ठिकाणी ग्रेनेड हल्ला केला.

    श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून आज पीएम नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला गृहमंत्री अमित शहांसह जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, या बैठकीच्या पूर्वसंध्येला काश्मीर खोऱ्यात दहशवादी सक्रीय झाल्याची माहिती मिळाली असून, दहशतवाद्यांनी एकाच दिवसांत तीन हल्ले केल्याचे समजते.

    जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर होत असलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी सक्रीय झाले असून, काश्मीर खोऱ्यात तीन ठिकाणी सुरक्षादलांवर हल्ले केले आहेत. एकाच दिवशी हे तीनही हल्ले झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी पुलवामा येथील नाकाबंदी केलेल्या ठिकाणी ग्रेनेड हल्ला केला. तसेच यापूर्वी राजपोरा चौक आणि शोपियां भागातील श्रीमल येथे दहशतवद्यांनी जम्मू काश्मीर पोलीस तसेच सीआरपीएफ जवानांवर हल्ले करण्यात आले आहेत.

    पंतप्रधान मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासोबतच हायस्पीड इंटरनेट सेवाही बंद ठेवल्या जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती या श्रीनगरहून दिल्लीत पोहोचल्या आहेत.