फाटके कपडे घालणं हा अपशकून, मध्यप्रदेशच्या कॅबिनेट मंत्र्यांना आठवली आई आणि आज्जी

फाटके कपडे घालणं हा आपल्या संस्कृतीत अपशकून मानला जातो, असं विधान मध्यप्रदेशच्या कॅबिनेट मंत्री उषा ठाकूर यांनी केलंय. ठाकूर या मध्यप्रदेशच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री आहेत. उत्तराखंंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ठाकूर यांनी आई आणि आजीचे संदर्भ दिले. भारतीय संस्कृतीत फाटके कपडे घालणं हे अशुभ मानलं जात असल्याचं त्या म्हणाल्या. 

    उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी फाटक्या जीन्सबाबत केलेल्या वक्तव्यावरून देशभर खळबळ उडाली असताना आता मध्यप्रदेशाच्या कॅबिनेट मंत्र्यांनी आणखी एक वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिलीय. त्यामुळे कपडे आणि संस्कृती हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

    फाटके कपडे घालणं हा आपल्या संस्कृतीत अपशकून मानला जातो, असं विधान मध्यप्रदेशच्या कॅबिनेट मंत्री उषा ठाकूर यांनी केलंय. ठाकूर या मध्यप्रदेशच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री आहेत. उत्तराखंंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ठाकूर यांनी आई आणि आजीचे संदर्भ दिले. भारतीय संस्कृतीत फाटके कपडे घालणं हे अशुभ मानलं जात असल्याचं त्या म्हणाल्या.

    पूर्वीच्या काळी एखादा कपडा फाटला, तर आई किंवा आजी तो कपडा घालू नको, असं सांगत असे. फाटके कपडे घालणं हे पारंपारिक विचारांच्या कुटुंबांमध्ये अशुभ मानलं जात असल्याचा दावा ठाकूर यांनी केलाय.

    मुलींनी फाटकी जीन्स घालण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री रावत यांनी टीका केल्यानंतर देशभरात वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियातून रावत यांच्यावर जोरदार टीकाही झाली होती. अनेकांनी फाटकी जीन्स घातलेले फोटोही अपलोड केले होते. त्यानंतर आता ठाकूर यांच्या विधानाने पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटलंय.