terrorists

दहशतवादी सुरक्षा दलाच्या कारवाईमुळे इतके भयग्रस्त(terrorist frightened of indian army) आहे की, याची कल्पना नवीन पोस्टर्सवरून(jaish e mohammad put threatening posters in muran village) येते. जम्मू-काश्मीरच्या पुलवामाच्या मुरन गावात दहशतवाद्यांनी धमकी असलेले पोस्टर्स लावले आहेत.

    श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये(jammu kashmir) सुरक्षा दलाच्या कारवारईमुळे भांबावलेल्या दहशतवादी संघटना(terrorist groups) रोज कोणता ना कोणता नवीन कट रचत आहेत. आपला कट निष्फळ झाल्यानंतर दहशतवाद्यांची भीती आता स्पष्ट दिसून येत आहे. यावेळी दहशतवादी सुरक्षा दलाच्या कारवाईमुळे इतके भयग्रस्त आहे की, याची कल्पना नवीन पोस्टर्सवरून येते. जम्मू-काश्मीरच्या पुलवामाच्या मुरन गावात दहशतवाद्यांनी धमकी असलेले पोस्टर्स लावले आहेत.


    पोस्टर्समध्ये धमकी देण्यात आली आहे की, लोकांनी सुरक्षा दलापासून दूर राहायला हवे. त्याचबरोबर पुढे लिहिले आहे की, जिथे सुरक्षा दलाचे जवान असतील तिथे आम्ही हल्ला करू. ही बदला घेण्याची वेळ आहे, असेही या पोस्टर्समध्ये लिहिले आहे. गावात हे पोस्टर्स जैश-ए-मोहम्मदने लावले आहेत. पोलिसांनी याविषयी माहिती गोळा करणे सुरू केली असून ते या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.