Jammu and Kashmir: Border Roads Organization undertakes snow clearance work on Srinagar-Leh road

जम्मू : जोरदार बर्फवृष्टी मुळे जम्मू काश्मिरमधील रस्त्यांवर बर्फाचे थर साचले आहेत. यामुळे अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या येथील रस्त्यांवर साचलेला बर्फ बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

बर्फ कटर मशीन असलेल्या वाहनाच्या मदतीने हा बर्फ हटवला जात आहे. जोरदार बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-लेह मार्ग मागील आठवडा भरापासून वाहतुकीसाठी बंद आहे.

बीआरओ अर्थात सीमा रस्ते संघटनेच्या माध्यमातून हे बर्फ हटवण्याचे काम केले जात आहे. आज संध्याकाळ पर्यंत रस्त्यावरील बर्फ हटवला जाईल अशी माहिती बीआरओकडून देण्यात आली. याचा व्हिडिओ देखील बीआरओने प्रसारित केला आहे.