केक कापणार इतक्यात चेहऱ्यावर उडाला आगीचा भडका आणि पुढे घडला धक्कादायक प्रकार…Video व्हायरल

या व्हिडिओमध्ये तरूणाने केक कापण्यासाठी हातात चाकू घेतला आणि इतक्यात त्याच्या मित्राने त्याच्या चेहऱ्यावर स्नो-स्प्रे स्प्रे केला. केकवरील स्पार्कलर कँडलही पेटलेली होती. अशात बर्थ डे बॉयच्या चेहऱ्यावरील स्नोनेही पेट घेतला. तो आग विझवण्यासाठी धडपडत होता.

  बर्थडे दिवशी घरातील लोक आणि मित्र वाढदिवस असलेल्या व्यक्तीला सरप्राइज देतात. तसेच या दिवशी ग्रॅंड सेलिब्रेशन आणि केक कटींगही केलं जातं. पण अनेकदा या आनंदाच्या क्षणी असं काही घडतं की, आनंद दु:खात बदलतो. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर शहारे उभे राहतील. असा हा एक धक्कादायक आणि थरारक व्हिडिओ आहे.

  या व्हिडिओमध्ये तरूणाने केक कापण्यासाठी हातात चाकू घेतला आणि इतक्यात त्याच्या मित्राने त्याच्या चेहऱ्यावर स्नो-स्प्रे स्प्रे केला. केकवरील स्पार्कलर कँडलही पेटलेली होती. अशात बर्थ डे बॉयच्या चेहऱ्यावरील स्नोनेही पेट घेतला. तो आग विझवण्यासाठी धडपडत होता. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओतील घटनेवर अनेकांनी टीका केली आहे. अनेकांनी अशा घटनांवर संपात व्यक्त केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Pune travel Blogger (@punetravelx)

  सोबतच हा व्हिडिओ आपल्याला हेही शिकवून जातो की, आनंद साजरा करताना काय करू नये. यात बघायला मिळतं की, एक तरूण केक कापणार असतो, पण अशात एका मित्राकडून करण्यात आलेली गंमत कशी महागात पडते.