फक्त मिनिटांत लसीचे दोन डोस; कोविशिल्डनंतर लगेच दिली कोव्हॅक्सीन

कोविशिल्डचा पहिला डोस घेणाऱ्या व्यक्तीला नंतर दुसरा डोस कोव्हॅक्सीनचा दिला किंवा कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेणाऱ्या व्यक्तीला नंतर कोविशिल्डचा दुसरा डोस दिल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. पण पाच मिनिटांच्या अंतराने कोविशिल्ड पाठोपाठ कोव्हॅक्सीनचा डोस दिल्याची घटना तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. हा प्रकार घडला आहे बिहारची राजधानी पाटणामध्ये.

    पाटणा : कोविशिल्डचा पहिला डोस घेणाऱ्या व्यक्तीला नंतर दुसरा डोस कोव्हॅक्सीनचा दिला किंवा कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेणाऱ्या व्यक्तीला नंतर कोविशिल्डचा दुसरा डोस दिल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. पण पाच मिनिटांच्या अंतराने कोविशिल्ड पाठोपाठ कोव्हॅक्सीनचा डोस दिल्याची घटना तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. हा प्रकार घडला आहे बिहारची राजधानी पाटणामध्ये.

    नेमके काय घडले?

    बिहारमध्ये एका महिलेला पाच मिनिटाच्या फरकाने कोविशिल्ड पाठोपाठ कोव्हॅक्सीन लसीचा डोस देण्यात आला. सुनीला देवी असे महिलेचे नाव आहे. सुदैवाने लसींचे लागोपाठ दोन डोस घेऊनही सुनीला देवी यांची प्रकृती ढासळलेली नाही. त्यांची प्रकृती चांगली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    पाटणा ग्रामीणमधील पुनपुन गावात 16 जूनला ही घटना घडली. बेलदारीचक येथील शाळेमध्ये लसीकरण शिबीर सुरु होते. 16 जूनला मी तिथे गेली, असे सुनीला देवी यांनी सांगितले. नाव नोंदणी केल्यानंतर सुनीला देवी रांगेमध्ये उभ्या होत्या. त्यावेळी त्यांना कोविशिल्ड लसीचा डोस देण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्यांनी निरीक्षण करण्यासाठी म्हणून त्यांना पाच मिनिट; थांबण्यास सांगितले. शाळेत उभारण्यात आलेल्या निरीक्षण खोलीमध्ये त्या थांबल्या होत्या. त्यावेळी दुसरी एक नर्स तिथे आली. तिने सुनीला देवी यांना कोव्हॅक्सीन लसीचा डोस दिला.

    हे सुद्धा वाचा