कमल हसनकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर

आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत खुद्द कमल हसन यांचे नाव नाही; परंतु दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे सल्लागार व्ही. पोनराज यांना पक्षाकडून तिकीट देण्यात आले आहे.

    चेन्नई (Chennai).  आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत खुद्द कमल हसन यांचे नाव नाही; परंतु दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे सल्लागार व्ही. पोनराज यांना पक्षाकडून तिकीट देण्यात आले आहे.

    तामिळनाडूच्या आयटी विभागाचे माजी सचिव डॉ. संतोष बाबू, व्ही पोनराज यांना मक्कल निधी मय्यम पक्षाने उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या उमेदवारांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. विधिमंडळात प्रवेश करणे, हे आमचे एकमेव उद्दिष्ट नाही तर निवडून आल्यानंतर किमान पन्नास टक्के आश्वासने पूर्ण करण्यावर आमचा भर राहील, असे कमल हसन यांनी स्पष्ट केले. कमल हासन यांनी निवडणूक लढवणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.

    प्रख्यात लेखक मार्क ट्वेन म्हणाले होते की, राजकारण हा घोटाळ्याचा शेवटचा उपाय आहे आणि आम्ही ते बदलण्यासाठी सज्ज आहोत. एक राजकारणी म्हणूनही भाषा, भाषण आणि संस्कृती स्वातंत्र्याचे मी ठामपणे रक्षण करत राहीन. -- कमल हसन, मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष