ink throwing on dipak salvi

एका महामेळाव्या दरम्यान पोलिसांच्या समोर कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी (Kannad Vedika Workers Attack On Deepak Dalvi) महाराष्ट्र एकीकरण समितीचे (Maharashtra Ekikaran Samiti) अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर काळी शाई फेकल्याची माहिती समोर आली आहे.

    महाराष्ट्र एकीकरण समितीचे (Maharashtra Ekikaran Samiti) अध्यक्ष दीपक दळवी (Deepak Dalvi) यांच्यावर आज हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली. (Ink Thrown On Deepak Dalvi) एका महामेळाव्या दरम्यान पोलिसांच्या समोर कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी (Kannad Vedika Workers Attack On Deepak Dalvi) दीपक दळवी यांच्यावर काळी शाई फेकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध नोंदवला आहे. यावेळी कर्नाटक सरकार बेळगावमधील मराठी जनतेवर अत्याचार करत असल्याचा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

    कर्नाटक सरकार, बेळगावमधील सत्ताधारी आणि काही कन्नड संघटना पोलिसांच्या मदतीने बेळगावमधील मराठी माणसावर अत्याचार करत आहेत. दरम्यान, दीपक दळवी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली जाणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

    “कर्नाटकमध्ये मराठी माणसावरील हल्ले आणि अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे मराठी माणसानं सोबत येणं गरजेचं आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी उद्या मंगळवारी कडकडीत बेळगाव बंद पाळला जाणार आहे,” अशी घोषणा पदाधिकाऱ्यांनी केली. कर्नाटकने कितीही अत्याचार केला, तरी आम्ही शांत बसणार नाही, आम्ही आमचा लढा सुरू ठेवू,असेही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.