गुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश

ओदिशामध्ये राज्य सरकारककडून सात जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. परंतु गुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये १६०० जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.

    गुलाब चक्रीवादळ (Cyclone Gulab) ओदिशामधील गोपालपूर आणि आंध्र प्रदेशमधील कलिंगपटनम या जिल्ह्यांच्या किनारी भागात लँडफॉल करणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच ओदिशामध्ये (Odisha) राज्य सरकारककडून सात जिल्ह्यांना हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे. परंतु गुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन (Landslide) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये १६०० जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.

    ओदिशा आपत्ती जलद कार्य दल (ODRAF) च्या 42 संघांसह अग्निशमन दलाचे जवान आणि राष्ट्रीय आपत्ती दलाच्या (NDRF) 24 तुकड्या गजपती, गंजम, रायगड, कोरापुट, मलकानगिरी, नबरंगपूर, कंधमाल या सात जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आल्या. हवामान विभागाने सांगितले की, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे वाऱ्याचा वेग 95 किलोमीटर प्रतितासापर्यंत अपेक्षित आहे. या दरम्यान, आंध्र आणि ओडिशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.