Madhya Pradesh: A big crocodile came in front of JBC and then ... the tremor started for two hours!

मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh)  भिंड येथील सिंध नदीला आलेला पूर गावकऱ्यांसाठी आपत्ती ठरला आहे. नदीच्या पुराच्या पाण्यामुळे मानवी वस्तीत मगरींचे प्रमाण वाढले आहे. पुराच्या पाण्यासह आलेल्या मगरीला पाहून लोकांमध्ये घबराट पसरली. पोलीस आणि वनरक्षक तात्काळ जेसीबीसह बचावासाठी आले. मात्र, मगर जबडा पसरून थेट जेसीबीसमोर आडवी आली. सुमारे एक क्विंटल आणि आठ फूट लांबीच्या मगरीला पाहून रेस्क्यू टीमची भांबेरी उडाली. अखेर दोन तासांनंतर या मगरीला जेसीबीच्या पंजाने उचलून सिंध नदीत सोडण्यात आले(Crocodile Rescue ).

    भिंड : मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh)  भिंड येथील सिंध नदीला आलेला पूर गावकऱ्यांसाठी आपत्ती ठरला आहे. नदीच्या पुराच्या पाण्यामुळे मानवी वस्तीत मगरींचे प्रमाण वाढले आहे. पुराच्या पाण्यासह आलेल्या मगरीला पाहून लोकांमध्ये घबराट पसरली. पोलीस आणि वनरक्षक तात्काळ जेसीबीसह बचावासाठी आले. मात्र, मगर जबडा पसरून थेट जेसीबीसमोर आडवी आली. सुमारे एक क्विंटल आणि आठ फूट लांबीच्या मगरीला पाहून रेस्क्यू टीमची भांबेरी उडाली. अखेर दोन तासांनंतर या मगरीला जेसीबीच्या पंजाने उचलून सिंध नदीत सोडण्यात आले(Crocodile Rescue ).

    मगरीला पाहून ग्रामस्थ हादरले. ग्रामस्थांनी ही माहिती पोलीस ठाण्यात दिली. वनविभागाचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. वनविभागाच्या पथकाने मगरीला दोरीने बांधण्याचा प्रयत्न केला, मात्र मगरीवर नियंत्रण मिळवता न आल्याने वनकर्मचाऱ्यांनी हात वर केले. यानंतर मगरीला जेसीबीमध्ये ठेवून त्याची सुटका करून नदीत सोडण्यात आले.

    3 ऑगस्ट रोजी शिवपुरीजवळ असलेल्या मानीखेडा धरणातून पाणी सोडल्यामुळे सिंध नदीला पूर आला होता. पुरामुळे जिल्ह्यातील अनेक गावे उद्ध्वस्त झाली होती. या गावकऱ्यांचे जीवन अद्याप रुळावर आलेले नाही. आता नदीकाठच्या ग्रामस्थांच्या मनात मगरीची दहशत पसरली आहे.

    मगरीला वाचवण्यासाठी आलेले वन कर्मचारी अप्रशिक्षित होते. मगरीसारख्या प्राणघातक प्राण्याला वाचवण्यासाठी वनकर्मचारी उपकरणाशिवाय पोहोचले. त्यांनी बचाव करण्यास असमर्थता व्यक्त केल्यावर स्टेशन प्रभारी सतेंद्र सिंह यांनी गावातून जेसीबी बोलावले.

    मगरीभोवती चार-पाच पोलिस आणि तीन-चार वनविभागाचे कर्मचारी होते. सर्वांनी हातात काठ्या घेतल्या. जेसीबीचा पंजा मगरीच्या दिशेने सरकताच ती आक्रमक झाली. मगरीने त्याच्यावर वार केला. मगरीने दोन ते तीन वेळा हल्ला केला. दरम्यान, वनकर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी काठीच्या साहाय्याने त्याला जेसीबीच्या पंजात उलटवले.