shivrajsingh chovhan

आज काल मी खतरनाक मूडमध्ये आहे. गडबड करणाऱ्यांना सोडणार नाही, मामा फॉर्ममध्ये आहे. माफियांच्या विरोधात मध्यप्रदेश सरकारने अभियान सुरू केले आहे. बळाचा वापर करून काहीही करता येणार नाही, ऐकून घ्या, मध्यप्रदेश सोडून द्या, अन्यथा तुम्हाला जमिनीत पुरून टाकेन, कोणाला पत्ताही लागणार नाही, अशी धमकीच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माफियांना दिली आहे.

भोपाळ :  मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माफियांना कठोर शब्दांत इशारा दिला आहे. त्यांनी मध्यप्रदेश सोडून द्यावे अन्यथा त्यांना दहा फूट जमिनीमध्ये गाडेल, असा सज्जड दम शिवराजसिंह चौहान यांनी भरला आहे.

आज काल मी खतरनाक मूडमध्ये आहे. गडबड करणाऱ्यांना सोडणार नाही, मामा फॉर्ममध्ये आहे. माफियांच्या विरोधात मध्यप्रदेश सरकारने अभियान सुरू केले आहे. बळाचा वापर करून काहीही करता येणार नाही, ऐकून घ्या, मध्यप्रदेश सोडून द्या, अन्यथा तुम्हाला जमिनीत पुरून टाकेन, कोणाला पत्ताही लागणार नाही, अशी धमकीच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माफियांना दिली आहे.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान पुढे म्हणाले की, सुशासनचा अर्थ आहे की, जनतेला त्रास होऊ नये. दादा, गुंड, बदमाश अशा कुणाचीही आता चालू देणार नाही. हे सुशासन आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवराजसिंह यांनी जबलपूरमध्ये एका सभेला संबोधित करताना असेच वक्तव्य केले होतं.

त्यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा उल्लेख करताना म्हटले होते की, कमलनाथ जी ऐका, माझी जनताच माझी देव आहे. माफियांना मुळासकट नष्ट करेन. ड्रग्ज व्यापारी, भू माफिया आणि गूंडाना आता शांत झोप लागणार नाही. मला आता कोणी अडवू शकत नाही.

मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरूनही विरोधकांवर हल्लाबोल केला होता. माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजयसिंह यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांबाबत अचानक प्रेम निर्माण झाले आहे. विरोधकांच्या उपवासावर टोला लगावताना ते म्हणाले होते की, उपवास ठेवायचाच असेल तर पश्चातापासाठी ठेवा. कारण तुम्हीच शेतकऱ्यांना रडवले आहे.