मध्यप्रदेश पोलिसांची मोठी कारवाई; बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश

बालाघाट जिल्ह्यातील किरनापूर आणि गोंदिया या भागात या प्रकऱणाचे अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. आतापर्यंत मध्यप्रदेशात झालेली बनावट नोटांविरुद्धची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

    गोंदिया: मध्यप्रदेश राज्यातील पोलिसांनी बनावट नोटांच मोठ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या बनावट मध्यप्रदेशातील बालाघाट आणि महाराष्ट्रातील गोंदिया भागात या बनावट नोटा खपवल्या जात असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. या कारवाईत पोलीस प्रशासनाने तब्बल पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांच्या पोलिसांना मुसक्या आवळल्या आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील बालाघाट आणि महाराष्ट्रातील गोंदिया (Gondia) भागात या बनावट नोटा खपवल्या जात असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. यामध्ये १० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत सर्व किंमतीच्या बनावट नोटा असल्याचं दिसून आल्या असल्याने मोठी खळबळ उडाली असून अटक करण्यात आलेल्या ८ आरोपींपैकी ६ बालाघाटचे तर २ गोंदियाचे रहिवासी असल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आल आहे.

    पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीकडून जप्त केलेल्या नोटांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटांची संख्या अधिक असून यासाठी कलर प्रिंटर किंवा स्कॅनरला वापर करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याचबरोबर या व्यक्तीकडे १० रुपयांच्या नोटेपासून ते अगदी २ हजार रुपयांच्या नोटेपर्यंत सर्व चलनाच्या बनावट नोटा आढळल्या असल्याने हे मोठे रॅकेट असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे.

    बालाघाट जिल्ह्यातील किरनापूर आणि गोंदिया या भागात या प्रकऱणाचे अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. आतापर्यंत मध्यप्रदेशात झालेली बनावट नोटांविरुद्धची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. या नोटांचा वापर नक्षलवाद पसरवण्यासाठी केला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मार्च महिन्यातही बनावट नोटा खपवण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून ४ लाख ९४ हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. आताच्या ५ कोटींच्या बनावट नोटांच्या प्रकरणाचा व पूर्वी बनावट नोटा आढळून आलेल्या त्या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस त्या दिशेनं तपास करत आहेत.