
विजयची पत्नी सात महिन्यांची गर्भवती होती, त्याला सहा वर्षांची लहान मुलगीही आहे. पत्नी गर्भवती असल्याने त्याने १५ दिवसांपासून तिच्याशी सेक्स केला नव्हता.(Rape On Minor Girls In Gujrat) या परिस्थितीमुळे त्याने लहान मुलींना लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला.
गांधीनगर: तीन लहान मुलींवर बलात्कार(Rape On 3 Minor Girls) करणाऱ्या एका क्रूरकर्म्याला पोलिसांनी गाजाआड केले आहे. या तीन मुलींपैकी एकीची हत्याही(Murder) त्याने केली आहे. विजय ठाकूर (Vijay Thakur)असं या नराधमाचं नाव आहे. पत्नी गर्भवती असल्याने सेक्स(Sex) करण्यासाठी त्याने लहान मुलींना लक्ष्य केले. लहान मुली फारसा शारिरिक विरोध करु शकणार नाहीत, हे माहित असल्याने आरोपी विजयने लहानग्यांना आपल्या वासनेचे शिकार बनवले. गुजरातच्या गांधीनगरमध्ये(Gandhinagar) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सर्वात पहिल्यांदा त्याने सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला, ती मुलगी नेमकं काय झालं, हे कुणाला सांगू शकली नाही. त्यामुळे या नराधमाने लहान मुलींना लक्ष्य करण्याचे ठरवले. असे केल्याने त्याची वासनाही पूर्ण होईल आणि तो करत असलेल्या दुष्कृत्याची माहितीही कुणाला होणार नाही, अशी त्याची समजूत होती.
१५ दिवसांपासून पत्नीशी सेक्स केला नव्हता
या क्रूरकर्मा विजयची पत्नी सात महिन्यांची गर्भवती होती, त्याला सहा वर्षांची लहान मुलगीही आहे. पत्नी गर्भवती असल्याने त्याने १५ दिवसांपासून तिच्याशी सेक्स केला नव्हता. या परिस्थितीमुळे त्याने लहान मुलींना लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या गुन्ह्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला आणि तो त्याच वर्षांच्या मुलींना भक्ष्य म्हणून शोधू लागला.
दिवाळीच्या दिवशी पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार
दीवाळीच्या दिवशी एका लहान पाच वर्षांच्या मुलीला नव्या कपड्यांचे आमिष दाखवून तो घेऊन गेला. तिच्यासोबत दुष्कृत्य करुन तो तिथून निघून गेला. या लहानगीला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिला चार ते पाच दिवस दवाखान्यातच ठेवण्यात आले. या मुलीने आरोपी विजयला पोलिसांसमोर ओळखले आहे.
६ नोव्हेंबरला गावागावात शोधत फिरला सावज
शेजारच्या गावी सहा नोव्हेंबरला गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही तरुण मुलींना गरबा खेळताना त्याने पाहिले. तो तिथे पोहोचला पण एकही मुलगी त्याला सापडली नाही. आजूबाजूंच्या गावांमध्येही तो गेला, पण त्याच्या पदरी निराशाच मिळाली. नवरात्र असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत जाग असल्याने त्याला रिकाम्या हातीच परतावे लागले होते.
तोंड दाबून तिसऱ्या मुलीला मारुन टाकले
एका चौकात त्याने आदिवासींचे आठ जणांचे कुटुंब झोपलेले पाहिले. त्यातील तीन वर्षांच्या मुलीला घेऊन तो पळून निर्जन स्थळी गेला. झोपलेल्या अवस्थेतच या लहानगीवर बलात्काराचा त्याने प्रयत्न केला, पण मुलीला जाग आली. मुलीने ओरडू नये म्हणून त्याने तिचे तोंड दाबले, यात या मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतरही तिच्या मृतदेहावर या क्रूरकर्म्याने बलात्कार केला आणि तिचा मृतदेह जवळच्या रस्त्यावर फेकून दिला होता.
सीसीटीव्ही फूटेजमुळे सापडला नराधम
पोलीस जेव्हा या प्रकरणाचा तपास करीत होते, तेव्हा सीसीटीव्ही फूटेजमध्ये अस्पष्टपणे हा दिसला होता. त्यानंतर एका ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्हीत याचे फुटेज स्पष्ट स्वरुपात दिसले आणि त्याच्या मोटारसायकलचीही ओळख पटली. त्यानंतर गावातील काही जणांकडे चौकशी केली असता, वंशजादा गावातील विजय या आरोपीकडे पोलिसांची संशयाची सुई रोखली गेली.
घरी पोहोचल्यावर विजयसारखा दिसणारा दुसरा माणूसही तिथे सापडला. त्यामुळे काही काळ पोलीसही गोंधळात पडले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले, अखेरीस मोबाईलवर त्याच्या लोकेशनचे डिटेल्स मिळवल्यानंतर खरा क्रूरकर्मा पोलिसांच्या हाती गवसला आहे.
या प्रकरणी तपास करण्यासाठी पोलिसांनी १०० पोलिसांच्या छोट्या छोट्या सहा तुकड्या केल्या होत्या. या नराधमाला लवकर अटक झाली नसती, तर जून काही लहान मुली याच्या वासनेच्या शिकार झाल्या असत्या. विजयला कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येते आहे.