क्रूरतेचा कळस, रोपटं उपटल्याचा राग डोक्यात घालून शेजाऱ्याने १२ वर्षांच्या मुलीला जिवंत जाळलं

बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील बरौनी भागात एक भयानक प्रकार समोर आला आहे. एक लहान रोपटं उपटल्यामुळे एका १२ वर्षांच्या मुलीवर रॉकेल ओतून जाळण्यात आलं आहे.(man burnt small girl for plucking plant at neighbors house) ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

    पटना: बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील बरौनी भागात एक भयानक प्रकार समोर आला आहे. एक लहान रोपटं उपटल्यामुळे एका १२ वर्षांच्या मुलीवर रॉकेल ओतून जाळण्यात आलं आहे.(man burnt small girl for plucking plant at neighbors house) ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

    जाळण्यात आलेल्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवरौना गावातील एक १२ वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. खेळता खेळता आपल्या शेजाऱ्याच्या घरी लावण्यात आलेलं भाजीपाल्याचं रोपटं तिनं उपटलं.  याची माहिती मिळाल्यानंतर शेजारी असलेल्या सिकंदर आणि त्याच्या पत्नीनं मुलीला मारहाण केली. तसेच त्यांनी रॉकेल ओतून मुलीला पेटवून दिलं, असा आरोप करण्यात आला आहे.

    बरौनीचे एसओ सुरेंद्र सिंह म्हणाले की, आरोपी पती पत्नी विरोधात बरौनी पोलीस ठाण्यात शनिवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जाळण्यात आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या त्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.सध्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तपासानंतरच या संपूर्ण घटनेविषयीचे सत्य समोर येणार आहे. या दोन्ही कुटुंबांमध्ये आधीपासूनच वाद सुरु होते.