Fraud

एका ॲपच्या माध्यमातून २५० कोटींची फसवणूक(250 Crore Fraud) केल्याची घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. या प्रकरणात उत्तराखंड पोलिसांनी नोएडा भागातून एका आरोपीला अटक केली आहे.

    उत्तराखंडमध्ये(Uttarakhand) फसवणुकीचा(Fraud) वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका ॲपच्या माध्यमातून २५० कोटींची फसवणूक(250 Crore Fraud) केल्याची घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. या प्रकरणात उत्तराखंड पोलिसांनी नोएडा भागातून एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने चार महिन्यांच्या काळात बरेच पैसे चोरले असल्याचे समजते.

    ५० लाख लोकांनी ॲप केलं डाऊनलोड 

    चीनच्या एका स्टार्टअप योजनेअंतर्गत तयार झालेल्या एका ॲपने लोकांना गंडा घातला आहे. देशातल्या जवळपास ५० लाख लोकांनी हे ॲप डाऊनलोड केलं होतं. या ॲपच्या माध्यमातून लोकांना १५ दिवसांमध्ये पैसे दुप्पट होणार असल्याचं सांगण्यात आलं. लोकांनी पॉवर बँक हे ॲप डाऊनलोड केलं. आणि त्यानंतर तुमचे पैसे आता १५ दिवसांमध्ये दुप्पट होतील असं आमिष त्यांना दाखवल्याचं समजतं.

    हरिद्वारचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने जेव्हा पोलिसांकडे धाव घेतली, तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. या फिर्यादीने सांगितलं की त्याने पैसे दुप्पट होतील म्हणून या ॲपमध्ये दोन वेळा अनुक्रमे ९३ हजार आणि ७२ हजार अशी रक्कम जमा केली होती. मात्र हे पैसे दुप्पट न झाल्याने या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केली.

    तपासात समोर आलं की ही सगळी रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली होती. जेव्हा या सगळ्या खात्यांच्या व्यवहारांबद्दल माहिती घेतल्यावर  २५० कोटी रुपयांची फसवणूक या झाल्याचं उघड झालं.