
बिहारमध्ये (Bihar Crime) मधेपुरा जिल्ह्यातील (Madhepura District) जुने पोलीस स्टेशन परिसरात एका ४ वर्षांच्या मुलीला नराधमाने(Rape And Murder Of 4 Year Old Girl) फूस लावून पळवून नेत बलात्कार करून तिची क्रूर हत्या केली.
पाटणा : बिहारमध्ये (Bihar Crime) महिलांप्रमाणेच लहान मुलींच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मधेपुरा जिल्ह्यातील (Madhepura District) जुने पोलीस स्टेशन परिसरात एका ४ वर्षांच्या मुलीला नराधमाने(Rape And Murder Of 4 Year Old Girl) फूस लावून पळवून नेत बलात्कार करून तिची क्रूर हत्या केली. पीडित मुलीचा मृतदेह एका तलावाच्या काठी सापडला. ही घटना उजेडात आल्यानंतर बिहारसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. नराधमालाच वेळीच अटक होऊन त्याला कठोरात कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून होऊ लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ डिसेंबरच्या रात्री सर्व लोक पंचायत निवडणुकीच्या तयारीत व्यस्त होते. याच रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर उभ्या असलेल्या टेम्पोजवळ चार वर्षांची निरागस मुलगी इतर मुलांसोबत खेळत होती. यावेळी पीडित मुलीच्या घराशेजारी राहणारा सौरभ उर्फ कोकलेश साहनी हा २४ वर्षीय तरुण मोटारसायकलवरून तेथे आला. त्याने निरागस मुलीला फूस लावून दुचाकीवर बसवले व तिला योगीराज रोडवर घेऊन गेला. रात्री दहा वाजेपर्यंत मुलगी घरी न परतल्याने तिच्या वडिलांसह इतर नागरिकांनी योगीराज रोडवर मुलीचा शोध घेतला. तेव्हा त्यांना एका तलावाच्या काठी असलेल्या झुडपात ती मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेचा उलगडा झाल्यानंतर आलेल्या संशयातून मुलीचे कुटुंबीय स्थानिक लोकांसह आरोपी सौरभच्या घरी त्याच्याबाबत विचारपूस करायला गेले. त्यावेळी घरी असलेल्या सौरभच्या भावाने तिथल्या सर्वांना धमकावले. नंतर स्थानिक लोकांनी सौरभचा शोध घेतला असता मृतदेह सापडलेल्या तलावाजवळील काही अंतरावरच सौरभची मोटारसायकल आणि कपडे सापडले. त्याआधारे पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपी सौरभविरोधात जुने पोलीस ठाण्यात निष्पाप मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप करीत तक्रार दाखल केली आहे. तसेच आरोपी सौरभचा भाऊ सुरेंद्र साहनी याच्याविरोधात आरोपी लपवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्याची क्रूर घटना घडूनही आरोपी अद्याप मोकाट आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपीला अटक करणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केली नाही. त्यामुळे घटनेसह पोलिसांच्या सुस्त कारभाराविरोधात स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.