लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची त्याने केली हत्या अन् मृतदेह…. ,बातमीने उडाली खळबळ

एका प्रियकराने आपल्या मैत्रिणीची हत्या(Boy Friend Killed His Live In Girlfriend) करुन तिचा मृतदेह घरातील किचनमध्ये पुरला. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

    रीवा : मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh) रीवा जिल्ह्यातील जवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावात एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका प्रियकराने आपल्या मैत्रिणीची हत्या(Boy Friend Killed His Live In Girlfriend) करुन तिचा मृतदेह घरातील किचनमध्ये पुरला होता. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. प्रेयसीचा मृतदेह पुरल्यानंतर खड्डा बुजवण्यासाठी त्याने त्यावर रंगकाम केले होते. रविवारी शेजारी राहणाऱ्या मेहुण्याला ती महिला दिसली नाही तेव्हा त्याला संशयास्पद वाटले. त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली.

    पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर आरोपीने तेथून पळ काढला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता स्वयंपाकघरात नुकतेच रंगकाम केलेले दिसले. पोलिसांनी खड्डा खणला असता त्यांना त्या महिलेचा मृतदेह आढळला. दोघेही १० वर्षांपासून एकत्र राहत होते. दोघांमध्ये भांडण झाले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. ते दोघे १० वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत होते.

    सहायक पोलिस अधीक्षक शिवकुमार वर्मा यांनी सांगितले की शांती मल्लाह आणि रामराज मांझी हे दोघे १० वर्षांपासून गावात एकत्र राहत होते. शनिवारी रामराजने धारदार शस्त्राने शांतीची हत्या केली. यानंतर त्याने मृतदेह स्वयंपाकघरात पुरला. रविवारी जेव्हा बराच वेळ शांती दिसत नसल्याने शेजारी राहणाऱ्या मेहुण्याला हा प्रकार संशयास्पद वाटला.

    पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता शांती आणि रामराज यांच्यात रात्री भांडण झाल्याचे समजले. त्यानंतर शांती दिसली नाही. त्यानंतर मेहुण्याने पोलिसांना कळविले. यानंतर रामराज तेथून पळून गेला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्यांना किचनमध्ये सारवलेला भाग संशयास्पद वाटला. त्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला बोलावून खड्डा खणला.

    पोलिसांना खड्ड्यातून महिलेचा मृतदेह सापडला. मिळालेल्या माहितीनुसार शांतीचे आधी लग्न झाले होते आणि १० वर्षांपूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. तिच्या पतीच्या निधनानंतर, ती दहा वर्षांनी लहान असलेल्या रामराजच्या प्रेमात पडली. यानंतर दोघेही गावात एकत्र राहू लागले. दोघांनाही मूलबाळ नव्हते, यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत असत.