mansukh vasava

गुजरातचे भाजप खासदार आणि माजी मंत्री मनसुख वसावा(mansukh vasava) यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नेत्यांच्या मनधरणीनंतर त्यांनी आपला राजीनामा(mansukh vasava took back his resignation) परत घेतला आहे.

अहमदाबाद : गुजरातचे भाजप खासदार आणि माजी मंत्री मनसुख वसावा(mansukh vasava) यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नेत्यांच्या मनधरणीनंतर त्यांनी आपला राजीनामा(mansukh vasava took back his resignation) परत घेतला आहे. राजीनामा परत घेण्यामागे त्यांनी अजब कारण सांगितले आहे. पक्षाचा राजीनामा दिला असता, तर त्यांना मोफतमध्ये उपचाराची सुविधा मिळाली नसती असे ते म्हणाले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला समजावले की, माझी पाठ आणि गळ्याच्या त्रासासाठी मोफत उपचार तेव्हाच मिळेल, जेव्हा मी खासदार पदावर कायम राहीन. मी राजीनामा दिला असता तर असे शक्य झाले नसते. पक्षाच्या नेत्यांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अशी सिस्टिम बनवण्यात येईल, ज्यामुळे स्थानिक नेते माझ्या वतीने कामकाज पाहतील असे वसावा म्हणाले. राजीनामा देण्यामागे माझे एकमेव कारण आरोग्य समस्या होती. आता वरिष्ठ नेत्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर मी आपला राजीनामा मागे घेतला आहे, असं मनसूख वसावा म्हणाले आहेत.

दरम्यान, पक्षावर नाराज असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मुख्य करुन नर्मदा जिल्ह्याच्या इको सेंसेटिव्ह झोनचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. पण, खरे पाहिले तर राज्य आणि केंद्र सरकार आपले प्रयत्न करत आहे. माझे पक्षासोबत कोणतेही मतभेद नाहीत. आदिवासी नेता वसावा म्हणाले की, भाजप सरकारने माजी सरकारांपेक्षा आदिवासींना खूप फायदा पोहोचवला आहे.