मध्य प्रदेशमधील बांधवगढ टायगर रिझर्व्ह पार्कमध्ये भीषण आग

या आगीमुळे जंगलातील वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाले असून लहान जीव, जंतू, पक्षी, प्राणी जळून भस्मसात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीच्या घटनेमुळे वाघ्र्यदर्शनासाठी बांधवगडला आलेले पर्यटकही दु:खी झाले आहेत. अद्यापही पूर्णपणे आगीवर नियंत्रण मिळविण्यात वनविभागाला यश आले नाही.

    उमरिया : मध्य प्रदेशमधील बांधवगढ टायगर रिझर्व्ह पार्कमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही आग लागली आहे, आगीला विझविण्यासाठी वन विभागाचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही आगीचे लोट पसरतच आहेत. वन विभागाच्याचा निष्काळजीपणामुळे ही आग दूरवर पसरली आहे. खितौली, मगधी, ताला या तीन जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात ही आग हळूहळू पसरली. सोशल मीडियावरुनही अनेकांनी या आगीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

    या आगीमुळे जंगलातील वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाले असून लहान जीव, जंतू, पक्षी, प्राणी जळून भस्मसात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीच्या घटनेमुळे वाघ्र्यदर्शनासाठी बांधवगडला आलेले पर्यटकही दु:खी झाले आहेत. अद्यापही पूर्णपणे आगीवर नियंत्रण मिळविण्यात वनविभागाला यश आले नाही.

    दरम्यान, सध्या उन्हाळा सुरू झाल्याने मध्य प्रदेशमध्येही कडक ऊन पडत आहे. या कडक उन्हामुळेच आगीच्या घटना सातत्याने वनपरिक्षेत्रात घडत आहेत. त्यामुळे, सर्वसामान्यांचेही मोठे नुकसान होत आहे. काही ठिकाणी दुकाने तर काही ठिकाणी उद्योग आगीच्या चपाट्यात येत आहेत. इंडस्ट्री परिसरालाही या आगीचा फटका बसत आहे.