जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत, त्रालला जाताना लष्कराने रोखल्याचं ट्विटद्वारे केलं स्पष्ट

जम्मू -काश्मीरमधील(Jammu Kashmir) त्रालला(Tral) भेट देण्याच्या तयारीत असताना नजरकैदेत ठेवल्याचं मेहबूबा मुफ्ती(House Arrest Of Mehbooba Mufti) यांनी आज ट्विटद्वारे स्पष्ट केलं आहे.

    पीडीपी प्रमुख आणि जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती(House Arrest Of Mehbooba Mufti) यांनी पुन्हा नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला आहे. जम्मू -काश्मीरमधील(Jammu Kashmir) त्रालला(Tral) भेट देण्याच्या तयारीत असताना नजरकैदेत ठेवल्याचं त्यांनी आज ट्विटद्वारे स्पष्ट केलं आहे. बाहेर पडण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर आज पुन्हा माझ्या घरात बंद आहे. हे काश्मीरचे खरे चित्र आहे, असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

    मंगळवारी लष्कराच्या जवानांनी पुलवामाच्या त्राल शहरात एका कुटुंबाला मारहाण केली आणि एका महिलेला जखमी केले, असा आरोप मुफ्ती यांनी केला होता. त्यानंतर आज त्या या पीडीत कुटुंबाला भेटायला जात होत्या.

    “लष्कराने कथितरीत्या तोडफोड केल्यानंतर त्रालमधील एका कुटंबाला भेट देण्यासाठी मी जात होते. मात्र, लष्कराने मला घराबाहेर पडू दिले नाही. बाहेर पडण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर आज पुन्हा माझ्या घरात बंद आहे. हे काश्मीरचे खरे चित्र आहे. भारत सरकारने स्वच्छ आणि ठरलेल्या पिकनिक दौऱ्यांऐवजी हे दाखवायला हवं,”अस ट्विट मुफ्ती यांनी केलंय.यापूर्वी ७ सप्टेंबर रोजी नजरकैदेत ठेवल्याचा दावा मुफ्ती यांनी केला होता.