Millions of sarees with photos of Modi and Yogi will look like BJP in UP elections; Order of sarees given in Surat

उ. प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लडकी हू लड सकती हू असा नारा दिलाय. ४० टक्के तिकिटेही महिलांना देण्यात आली आहेत. याला काऊंटर करण्यासाठी भाजपाही मैदानात उतरली आहे. राज्यातील अर्ध्या संख्येच्या मतदार असलेल्या महिलांसाठी भाजपाने यावेळी नवी रणनीती तयार केली आहे. साड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये लोकप्रिय होण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे या साड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे फोटो छापण्यात येत आहेत. यावर भाजपाच्या काही घोषणाही छापण्यात येत आहेत. गेल्या निवडणुकीत हे पाहायला मिळाले नव्हते(Millions of sarees with photos of Modi and Yogi will look like BJP in UP elections; Order of sarees given in Surat ).

  लखनौ : उ. प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लडकी हू लड सकती हू असा नारा दिलाय. ४० टक्के तिकिटेही महिलांना देण्यात आली आहेत. याला काऊंटर करण्यासाठी भाजपाही मैदानात उतरली आहे. राज्यातील अर्ध्या संख्येच्या मतदार असलेल्या महिलांसाठी भाजपाने यावेळी नवी रणनीती तयार केली आहे. साड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये लोकप्रिय होण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे या साड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे फोटो छापण्यात येत आहेत. यावर भाजपाच्या काही घोषणाही छापण्यात येत आहेत. गेल्या निवडणुकीत हे पाहायला मिळाले नव्हते(Millions of sarees with photos of Modi and Yogi will look like BJP in UP elections; Order of sarees given in Surat ).

  यासारख्या ५० हजार साड्यांची ऑर्डर, लखौ, कानपूर, गोरखपूर आणि वाराणसी य़ा चार शहरांतून देण्यात आल्या आहेत. सूरतमध्ये व्यापार करणारे गोरखपूर आणि कानपूरचे दोन व्यापारी, इतर व्यापाऱ्यांसोबत एशा एक लाख साड्या विना ऑर्डरच्या राज्य़ात पाठवित आहेत. या सगळ्या साड्या सध्या गुजरातमध्ये सूरत येथे तयार होत आहेत. सूरत हे देशातील साड्यांचे होलसेल मार्केट म्हणून ओळखले जाते. अजून दोन लाखांच्या साड्यांची ऑर्डर येत्या एक दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे.

  साड्यांवर मोदी सरकारमधील मोठी कामेही

  या साड्यांवर नवे काशी विश्वनाथ मंदिर, अयोध्येतील राम मंदिर, मोदी-योगी यांचे फोटो, कमळाच्या चिन्हासह भाजपा आणि हिंदुत्वाच्या घोषणा हे सगळे छापलेले आहे. या साड्या थ्री डी प्रिंट वाल्य़ा असून, उ. प्रदेशात त्या वाटण्यात येणार आहेत. जो राम को लेकर आये है, उनको हम लेकर आयेंगे यासारख्या घोषणा या साड्यांवर छापलेल्या आहेत. मेरठ, लखनौ, कानपूर, गोरखपूर इथल्या साड्यांच्या शोरुममध्येही अशा साड्या विक्रीला आल्या आहेत.

  काही व्यापाऱ्यांनी याची सॅम्पल्स तयार केली असून, ते ऑर्डरची वाट पाहतायेत. तर काही व्यापाऱ्यांनी सर्व परिचितांना या साड्या मोफत वाटण्यास सुरुवातही केली आहे.

  सूरमधील २० ते २४ साडीनिर्माते सध्या या साड्या तयार करण्याचे काम करीत आहेत. या साड्या तयार करण्यासाठी २०० ते ५०० रुपयांचा खर्च होतो आहे. बाजारात या साड्यांची विक्री एक हजार ते अडीच हजार रुपयांना होते आहे.

  कोरोनाची मंदी केली

  या वजनाला हलक्या असलेल्या साड्या दिसायला आणि क्वालिटीतही चांगल्या आहेत. याच्यासोबत टोप्या, कोट, झेंडे यांचीही मागणी वाढली आहे. कोरोना काळात सूरतच्या कापड व्यवसायावर आलेली मंदी, या निवडणुकांमुळे दूर पळाली आहे. राजकीय पक्षांकडून मोठ्या ऑर्डर मिळत असल्याने व्यापारी खुशीत आहेत. सर्वाधिक ऑर्डर या उ. प्रदेशातून येत आहेत. येत्या १० ते १५ दिवसांत या ऑर्डर पूर्ण होतील अशी आशा आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022