लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नराधमांनी तिला ट्रकमध्ये बसवलं अन् आळीपाळीने केला बलात्कार, प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून प्रेत नदीमध्ये टाकून पसार

लिफ्ट देण्याचा बहाणा करत ट्रकमध्ये बसवून अल्पवयीन मुलीवर आळीपाळीनं बलात्कार (Rape On Minor Girl) झाल्याची घडना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

    ग्वाल्हेर: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape On Minor Girl) करण्यात आला. या बलात्कारानंतर मुलगी आपल्यासोबत झालेला प्रकार घरी जाऊन सांगेल, म्हणून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. तिघांनी एका १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape On 14 Year Old Girl) केला. त्यानंतर तिचं प्रेत (Murder) नदीत फेकून दिल्याची माहिती मिळाली आहे. २७ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेबाबत नुकत्याच धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

    लिफ्ट देण्याचा बहाणा करत ट्रकमध्ये बसवून अल्पवयीन मुलीवर आळीपाळीनं बलात्कार झाल्याची घडना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

    मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांनी अतिप्रसंग करत तिचा आळीपाळीनं बलात्कार केला. रविवारी या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असल्याचं पोलीस अधीक्षक अमित सांघी यांनी सांगितलं. तीन आरोपींपैकी दोघे जण ट्रक ड्रायव्हर असून ट्रक चालकांनी अल्पवयीन मुलीला उत्तर प्रदेशात घेऊन जाण्यासाठी लिफ्ट देण्याचा बहाणा केला होता. यानंतर वाटेत अल्पवयीन मुलीचा शेजारी आणि दोघा ट्रक चालकांनी आळीपाळीनं तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.

    धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी घरी जाऊन आपल्यासोबत काय घडलं हे सांगेल, याच्या भीतीनं तिघांनीही या मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर या मुलीचं प्रेत नदीत फेकून दिलं. भिंड जिल्ह्यातील चिंबल नदीत या मुलीचं प्रेत फेकून देण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तपास करत ही माहिती समोर आली आहे, ती सगळ्यांनाच हादरवणारी आहे.