पंतप्रधान मोदी बांग्लादेशमध्ये, पडसाद पश्चिम बंगालमध्ये, प्रचाराचा माहौल होतोय गरम

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडं पाहिलं जातंय. उद्या म्हणजेच २७ तारखेला पंतप्रधान मोदी मतुआ समाजाशी संबंधित काही ठिकाणांना भेटी देणार आहेत. बंगालमध्ये मतुआ समाजाचं चांगलंच प्राबल्य असून या समाजाची मतदारसंख्याही मोठी आहे. पश्चिम बंगालमध्ये ७० पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये मतुआ समाजाचं प्राबल्य आहे.

    भारताचा शेजारी बांग्लादेश आज (शुक्रवारी) आपला सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. याचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेशमध्ये हजर झाले आहेत. त्याचं जंगी स्वागत झाल्यानंतर नियोजित कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. कोरोनानंतर पहिला दौरा म्हणून मोदींच्या या दौऱ्याकडं पाहिलं जात असलं, तरी त्याबरोबरच पश्चिम बंगालच्या निवडणुकीवरही या दौऱ्याचा परिणाम होताना दिसत आहे.

    पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडं पाहिलं जातंय. उद्या म्हणजेच २७ तारखेला पंतप्रधान मोदी मतुआ समाजाशी संबंधित काही ठिकाणांना भेटी देणार आहेत. बंगालमध्ये मतुआ समाजाचं चांगलंच प्राबल्य असून या समाजाची मतदारसंख्याही मोठी आहे. पश्चिम बंगालमध्ये ७० पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये मतुआ समाजाचं प्राबल्य आहे.

    बांगलादेशमधील गोपाळगंज या ठिकाणी असणाऱ्या मतुआ समाजाचे धर्मगुरू हरिचंद्र ठाकूर यांच्या जन्मस्थळासह अनेक जागांना मोदी भेट देणार आहेत. या जागांना भेट देणारी मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बतुआ समाजाचे नेतेदेखील मोदींसोबत दिसणार आहेत.

    याचा किती परिणाम मतदानावर होतो, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर मोदींचा बांगलादेश दौरा भाजपच्या पथ्यावर पडेल, असं सांगितलं जातंय.