अखिलेशसमोर मोदींच्या नावाच्या घोषणा; मोदी समर्थकांची हुल्लडबाजी

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव राधा राणीच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचले त्यावेळी मात्र त्यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. अखिलेश येथे पोहोचताच लोकांनी हुल्लडबाजी करीत घोषणा दिल्या. तथापि अखिलेश यांनी मंद स्मित करत तेथून काढता पाय घेतला.

    मथुरा: मथुरामधील बरसानाची लठमार होळी जगभर प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव राधा राणीच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचले त्यावेळी मात्र त्यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. अखिलेश येथे पोहोचताच लोकांनी हुल्लडबाजी करीत घोषणा दिल्या. तथापि अखिलेश यांनी मंद स्मित करत तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर यादव मंदिराच्या प्रांगणात आले असता. लोकांनी मोदी मोदीच्या घोषणा देत हुल्लडबाजी केली, असता अखिलेश समर्थकांनीही अखिलेश यादव जिंदाबादच्या घोषणा दिल्या. विशेष म्हणजे किसान महापंचायतीला संबोधित करण्यापूर्वी ते बांके बिहारीचे दर्शन घेण्यासाठी येथे आले होते. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी साधू संतांची भेट घेतली व त्यांच्यासोबत चर्चाही केली.