मत देताच खात्यातून पैसे गायब; बिहारमध्ये ग्रामपंचायतींसाठी निवडणुकी दरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस 

बिहारमध्ये ग्रामपंचायतींसाठी निवडणुका सुरू असून मुंगेरमध्ये मतदानाच्या 9 व्या टप्प्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदानानंतर काही मतदारांनी बँक खाते रिकामे झाल्याच्या तक्रारी करत गोंधळ घातला. चडौन गावात मतदानासाठी बायोमॅट्रीकसाठी अंगठ्याचे ठसे घेतल्यानंतर आणि आधार क्रमांक दिल्यानंतर या मतदारांच्या खात्यातील पैसे काढण्यात आले होते(Money disappears from account as soon as you vote; Shocking pattern revealed during Gram Panchayat elections in Bihar).

    पाटणा : बिहारमध्ये ग्रामपंचायतींसाठी निवडणुका सुरू असून मुंगेरमध्ये मतदानाच्या 9 व्या टप्प्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदानानंतर काही मतदारांनी बँक खाते रिकामे झाल्याच्या तक्रारी करत गोंधळ घातला. चडौन गावात मतदानासाठी बायोमॅट्रीकसाठी अंगठ्याचे ठसे घेतल्यानंतर आणि आधार क्रमांक दिल्यानंतर या मतदारांच्या खात्यातील पैसे काढण्यात आले होते(Money disappears from account as soon as you vote; Shocking pattern revealed during Gram Panchayat elections in Bihar).

    उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितले की किमान 7 मतदारांनी त्यांच्यासोबत हा प्रकार घडल्याची तक्रार केली आहे. मतदानांनंतर या मतदारांच्या खात्यातले सगळे पैसे काढून घेण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी रवी कुमार सिंह नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. ज्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला त्या मतदानकेंद्रावर रवी ड्युटीला होता.

    पोलिसांनी रवीची चौकशी केली असता रवीने मोबाईल अॅपच्या मदतीने आपण या मतदारांच्या खात्यातील सगळी रक्कम काढून घेतल्याचे कबूल केले आहे. मतदारांनी मतदानानंतर खात्यातून पैसे काढून घेतल्याचे कळाल्यानंतर केलेल्या तक्रारीनंतर उपविभागीय अधिकारी खुशबू गुप्ता यांनी फौजफाट्यासह मतदान केंद्रावर धडक दिली आणि बायमेट्रीक व्यवस्था संचालक रवी कुमार सिंहला ताब्यात घेतलं.