
एका बँक मॅनेजरने आपल्या बँकेच्या शाखेतील खातेधारकांची खाती रिकामी केल्याची घटना घडली आहे. या खातेधारकांच्या अकाऊंटमधून ३६ लाख रुपये काढून, ते ऑनलाईन जुगारात या बॅक मॅनेजरने उडवले. खातेधारकांनी जेव्हा बॅलन्स चेक केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की खात्यात पैसेच नाहीत. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर अखेरीस या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.
कुल्लू : एका बँक मॅनेजरने आपल्या बँकेच्या शाखेतील खातेधारकांची खाती रिकामी केल्याची घटना घडली आहे. या खातेधारकांच्या अकाऊंटमधून ३६ लाख रुपये काढून, ते ऑनलाईन जुगारात या बॅक मॅनेजरने उडवले. खातेधारकांनी जेव्हा बॅलन्स चेक केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की खात्यात पैसेच नाहीत. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर अखेरीस या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात हा आश्चर्यजनक प्रकार घडला आहे.
दोहरानाला गावात असलेल्या हिमाचल ग्रामीण बँकेतील १० शातेधारकांच्या अकाऊंटमधून ३६ लाख रुपये लंपास करण्यात आले होते. तपासात आणखी काही खातेधारकांना फसवल्याचे आणि ३६ लाखांचा आकडा वाढण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. सुरुवातीला केवळ १० जणांच्या तक्रारी मिळाल्या सल्या तरी पोलिसांनी बँकेच्या शाखेचे सर्व रेकॉर्ड जप्त केले आहेत.
हा बँक मॅनेजर गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन जुगार खेळत होता. सुरुवातीला ज्या अकाऊंटमधून पैसे काढून तो खेळत असे, पैसे जिंकल्यानंतर तो काढलेली रक्कम परत त्या त्या खात्यात जमा करीत असे. त्यामुळे सुरुवातीला हा घोटाळा उघड झाला नव्हता. मात्र नंतर सातत्याने तो जुगारात हरत गेला, त्यामुळे काढलेली रक्कम परत अकाऊंटमध्ये टाकणे त्याला शक्य झाले नाही. खातेधारकांनी बॅलन्स चेक केल्यावर त्यांच्या लक्षात आले की खआत्यातील पैसे कमी झाले आहेत. त्यानंतर याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली.
या मॅनेजरला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून, त्याने अजून किती जणांच्या खात्यातूंन पैसे काढलेत, याची चौकशी आता पोलीस करीत आहेत.