धक्कादायक – बलात्कारानंतर झालेल्या अपमानामुळे अल्पवयीन तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, अवघ्या ४० दिवसांच्या स्वत:च्या बाळाचा दाबला गळा

मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh) दामोह जिल्ह्यातील बलात्कार पीडित तरुणीने आपल्याच ४० दिवसांच्या बाळाची हत्या(Rape Victim Minor Girl Killed Her Own Child) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

    बलात्कारानंतर (Rape Victim)होत असलेला अपमान सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याची एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh) दामोह जिल्ह्यातील या बलात्कार पीडित तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तरुणीने आपल्याच ४० दिवसांच्या बाळाची हत्या(Rape Victim Minor Girl Killed Her Own Child) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

    बलात्कारानंतर पीडित तरुणीने बाळाला जन्म दिला होता. वारंवार होणाऱ्या अपमानामुळे तरुणीने बाळाला मारल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलीचे एका १७ वर्षाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. फेब्रुवारी महिन्यात मुलाने बलात्कार केल्यानंतर ती गरोदर राहिली होती. मुलीने ऑगस्ट महिन्यात पोट दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर कुटुंबियांना याची माहिती मिळाली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनीच त्यांना याबद्दल सांगितलं, नंतर मुलीने सगळा प्रकार सांगितला.

    मुलीच्या कुटुंबाने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं होतं. यादरम्यान मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तरुणीने १६ ऑक्टोबरला बाळाला जन्म दिला. ५ नोव्हेंबरला तिला रुग्णालयातून सोडण्यात आलं.

    दरम्यान तरुणीने आपल्या बाळाची हत्या केल्यानंतर एका स्थानिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. आपलं बाळ आजारी असल्याचं तिने खोटं सांगितलं. पण बाळाचा आधीच मृत्यू झाला होता. शवविच्छेदन केलं असता गळा दाबल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर तरुणीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तिला बालसुधारगृहात पाठवलं आहे.