पंजाबमध्ये जिओच्या टॉवर्सवर शेतकऱ्यांचा हल्लाबोल, १३०० टॉवर्सची तोडली वीज

गेल्या काही दिवसांत पंजाबमध्ये विविध ठिकाणच्या १३०० पेक्षा अधिक टॉवर्सच्या वायर आंदोलन समर्थकांनी तोडून लागल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं ग्राहकांना मोबाईल सेवा पुरवण्यात अडथळे येत असल्याची प्रतिक्रिया जिओच्या वतीनं देण्यात आलीय. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी जिओचं मोबाईल नेटवर्क गायब झालं असून जिओच्या ग्राहकांची चांगलीच पंचाईत झालीय.

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात पंजाबमधील अनेक शेतकरी आणि विविध संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. आंदोलन शेतकऱ्यांनी रिलायन्सच्या जिओ मोबाईलवर बंदी घालण्याची घोषणा केल्यानंतर त्याचे पडसाद पंजाबमध्ये उमटताना दिसतायत.

गेल्या काही दिवसांत पंजाबमध्ये विविध ठिकाणच्या १३०० पेक्षा अधिक टॉवर्सच्या वायर आंदोलन समर्थकांनी तोडून लागल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं ग्राहकांना मोबाईल सेवा पुरवण्यात अडथळे येत असल्याची प्रतिक्रिया जिओच्या वतीनं देण्यात आलीय. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी जिओचं मोबाईल नेटवर्क गायब झालं असून जिओच्या ग्राहकांची चांगलीच पंचाईत झालीय.

पूर्ण पंजाब राज्यात जिओचे ९ हजार टॉवर्स आहेत. त्यापैकी आतापर्यंत १३०० टॉवर्सना वीजपुरवठा करणाऱ्या वायर आंदोलकांनी तोडून टाकल्या आहेत. केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत आणि दिल्लीच्या सीमेवर महिन्याभरापासून कडाकाच्या थंडीत आंदोलन करणऱ्या शेतकऱ्यांचा संघर्ष संपवावा, अशी जोरदार मागणी आता पंजाबमधील आंदोलनसमर्थकांकडून होऊ लागलीय.

या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी अंबानी आणि अदानी या समूहाच्या वस्तू आणि सेवा न घेण्याचं आवाहन करत दोन्हींवर बहिष्कार घातलाय. शेतकऱ्यांनी जिओ मोबाईलचं कनेक्शन घेऊ नये आणि सध्याचं कनेक्शनही बंद करावं, यासाठी पंजाबमधील शेतकरी आग्रही असल्याचं सांगितलं जातं. तर सर्वसामान्यांना त्रास होईल, असं कुठलंही कृत्य आंदोलकांनी करू नये, असं आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केलंय.