देशातल्या या ठिकाणी मिळतो सर्वात महाग चहा, तब्बल १००० रुपये आहे किंमत

कोलकाताच्या (Kolkata) मुकुंदपूरमध्ये देशातील सर्वात महाग चहाचं दुकान(Most Expensive Tea Stall In India) आहे. या छोट्याशा स्टॉलमध्ये ग्राहकांसाठी १०० प्रकारचे वेगवेगळे चहा उपलब्ध आहेत.

    चहाप्रेमी नेहमीच चहाच्या प्रेमात असतात. चहासाठी ते काहीही करायला तयार असतात. चहाप्रेमींसाठी आज आम्ही भारतातली अशी एक जागा सांगत आहोत जिथे एक कप चहाची किंमत तब्बल एक हजार (Tea For 1000 Rupees)रुपये आहे.

    कोलकाताच्या (Kolkata) मुकुंदपूरमध्ये देशातील सर्वात महाग चहाचं दुकान(Most Expensive Tea Stall In India) आहे. या छोट्याशा स्टॉलमध्ये ग्राहकांसाठी १०० प्रकारचे वेगवेगळे चहा उपलब्ध आहेत. इथे एक कप चहाची किंमत अगदी बारा रुपयांपासून सुरू होऊन हजार रुपये प्रति कप इतकीही आहे.

    एक हजार रुपये किंमत असणाऱ्या या एक कप चहाची खासियत सांगायची तर चहासाठी Bo-Lay नावाची चहा पावडर वापरली जाते. या एक किलो चहा पावडरची किंमत ३ लाख रुपये आहे.

    या दुकानाच्या मालकाचं नाव आहे, पार्थ प्रातिम गांगुली. त्यांनी २०१४ मध्ये हे दुकान सुरू केलं. पार्थ सुरुवातीला नोकरी करायचे, मात्र नंतर त्यांनी नोकरी सोडली आणि आपलं आवडीचं काम म्हणजेच चहा विकण्याचं काम सुरू केलं. हळूहळू त्यांचा चहा आसपासच्या परिसरातही प्रसिद्ध झाला आणि आता त्यांचा चहा देशभरात प्रसिद्ध झाला आहे.