धक्कादायक – मुलाच्या आठवणीने व्याकुळ होऊन आईने whatsapp Status मध्ये लिहिलं ‘I Miss You’ अन् काही क्षणात मुलाने केली आत्महत्या

आपल्या मुलाची आठवण आली,म्हणून  एका  आईने whatsapp च्या स्टेटसवर मुलाचा फोटो ठेवला आणि ‘मला तुझी आठवण येते’ (I Miss You) असं लिहिलं . असा स्टेटस ठेवल्यानंतर काही तासांमध्ये त्या बाईच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

    कोटा:  राजस्थानमधील कोटा शहरामध्ये एक वेगळीच घटना पाहायला मिळाली आहे. आपल्या मुलाची आठवण आली,म्हणून  एका  आईने whatsapp च्या स्टेटसवर मुलाचा फोटो ठेवला आणि ‘मला तुझी आठवण येते’ (I Miss You) असं लिहिलं . असा स्टेटस ठेवल्यानंतर काही तासांमध्ये त्या बाईच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

    मृत्यू झालेल्या मुलाचं नाव मोहितकुमार असं आहे. तो जयपूरच्या (Jaipur) सांगानेरमधला रहिवासी होता.तो
    कोटामध्ये भाड्याने खोली घेऊन राहत होता. तो इंजिनीअरिंगचा विद्यार्थी होता.  मोहितकुमारने त्याने मित्राच्या खोलीवर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. मोहितकुमारच्या मित्राने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मोहितकुमारला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं; मात्र त्याचा मृत्यू झाला.

    रात्री उशिरापर्यंत मोहित त्याच्या मित्राच्या खोलीत प्रॅक्टिकलची तयारी करत होता. त्याच्यासोबत इतर विद्यार्थीही होते. रात्री उशिरा त्याला एक फोन आल्याने ते बाहेर गेला. त्यानंतर तो खोलीत आला आणि झोपण्यासाठी मित्राच्या खोलीवर निघून गेला. थोड्या वेळात मित्र त्याच्या खोलीत गेला,तेव्हा त्याला मोहित फासावर लटकत असलेला दिसला. मोहितच्या आत्महत्येचे कारण अजून समजलेले नाही. मोहितच्या खोलीत सुसाईड नोटही मिळालेली नाही.

    मोहितचा मृत्यू झाला त्या रात्री त्याचं आई-वडिलांशी फोनवर बोलणं झालं होतं. बोलणं झाल्यानंतर आईने ‘आय मिस यू’ असं लिहून मोहितचा फोटो स्टेटसला ठेवला होता; पण त्या आईला आपला मुलगा आत्महत्या करेल आणि आपण कायम त्याची आठवण काढत बसू याची कल्पनाही नव्हती.