nitish kumar- upcoming election

बिहार विधानसभा निवडणूकीत भाजपा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण भाजपाचे उमेदवार ७१ जागांवर आघाडीवर आहेत. तर संयुक्त जनता दलाचे (जदयू)चे ५२ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता विजयानंतर भाजपा नितीशकुमार यांना मुख्यमंत्री पद देण्याचे वचन देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये मोठा अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळाला. मतमोजणीच्यी सुरुवातीपासून राजदने आघाडी पकडली होती. परंतु सुरुवातीच्या दोन तासानंतर भाजपाच्या एनडीएने पुनरागमण केले. त्यामुळे एनडीने राजद आणि इतर पक्षांच्या महागठबंधनला मागे टाकत बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे.

हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार एनडीएचे उमेदवार २४३ जागांपैकी १३१ जागांवर आघाडीवर आहेत. तर महागठबंधन ९६ जागांवर पुढे आहे. त्यामुळे एनडीए बहुमतासाठी १२२ जागा जिंकून बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तास्थापन करु शकते असे चित्र सध्या दिसत आहे.

भाजपा ठरणार सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष