बिहारच्या बक्सरचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये काही विद्यार्थी चक्क मालगाडीवर बसून स्वगृही परतण्याचा प्रवास करीत आहे. विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून मालगाडीवरून प्रवास करताना दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची तपासणी केल्यानंतर हे व्हिडिओ गेल्या रविवारीचा असल्याचे आढळून आले आणि प्रवासी लोक परीक्षक आहेत. विद्यार्थी वनरक्षकाची परीक्षा देण्यासाठी बाहेरगावी गेले होते. पण घरी परतताना त्यांना ट्रेन मिळाली नाही. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी मालगाडीवर बसून नियोजित रेल्वे स्टेशन पर्यंतचा प्रवास करण्याचे ठरविले.

  • व्हिडिओवरून सत्तापक्ष आणि विरोधक आले आमने-सामने; असुविधेवर एकमेकांवर ओढले ताशेरे

पाटणा (Patna).  बिहारच्या बक्सरचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये काही विद्यार्थी चक्क मालगाडीवर बसून स्वगृही परतण्याचा प्रवास करीत आहे. विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून मालगाडीवरून प्रवास करताना दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची तपासणी केल्यानंतर हे व्हिडिओ गेल्या रविवारीचा असल्याचे आढळून आले आणि प्रवासी लोक परीक्षक आहेत. विद्यार्थी वनरक्षकाची परीक्षा देण्यासाठी बाहेरगावी गेले होते. पण घरी परतताना त्यांना ट्रेन मिळाली नाही. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी मालगाडीवर बसून नियोजित रेल्वे स्टेशन पर्यंतचा प्रवास करण्याचे ठरविले.

विद्यार्थ्यांचा मालगाडीवरील जीवघेणा प्रवास बघून विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे. राष्ट्रीय जनता दलाने ट्वीटद्वारे या विषयावर सरकारला घेराव घातला आहे. आरजेडीने लिहिले आहे की, वनरक्षकाच्या परीक्षेसाठी बिहारमधील उमेदवारांना मालवाहतुकांवर बसून त्यांच्या परीक्षेच्या केंद्रांवर यावे लागले होते, अशा प्रकारे त्यांना त्यांचा जीव धोक्यात घालावा लागत आहे.

त्याचवेळी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले की, भाजपच्या नितीश कुमार सरकारने बीपीएससी विद्याथ्र्यांसाठी परीक्षा केंद्र गृह नियोजित जिल्ह्यापासून काही किलोमीटर अंतरावर निश्चित केली आहे. तिथे पोहोचण्यासाठी रेल्वेची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. ऐन थंडीच्या दिवसात विद्याथ्र्यांना मालगाडीवरून खुला प्रवास करावा लागत आहे.