
बिहारमधील एका लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या लग्नसमारंभात सनातन परंपरेला फाटा देत वर-वधूने लोकशाहीचे सर्वात मोठे प्रतीक असलेली राज्यघटना केंद्रस्थानी ठेवून संविधानाच्याच साक्षीने विवाह केला. भारतीय राज्यघटनेच्या साक्षीने झालेल्या लग्नाची चर्चा शहरातच नाही, तर सगळीकडे सुरू आहे. पुनपुन ब्लॉकमध्ये आयोजित हा अनोखा विवाह सोहळा केवडा पंचायतचे प्रमुख सतेन्द्र दास यांच्या घरी पार पाडला.
पाटणा : बिहारमधील एका लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या लग्नसमारंभात सनातन परंपरेला फाटा देत वर-वधूने लोकशाहीचे सर्वात मोठे प्रतीक असलेली राज्यघटना केंद्रस्थानी ठेवून संविधानाच्याच साक्षीने विवाह केला. भारतीय राज्यघटनेच्या साक्षीने झालेल्या लग्नाची चर्चा शहरातच नाही, तर सगळीकडे सुरू आहे. पुनपुन ब्लॉकमध्ये आयोजित हा अनोखा विवाह सोहळा केवडा पंचायतचे प्रमुख सतेन्द्र दास यांच्या घरी पार पाडला.
एरव्ही हिंदू धर्मात पंडितांकडून विवाह समारंभाच्या विधी पार पाडल्या जातात. मात्र, या लग्नात असे काहीही नव्हते. हा विवाह सोहला पंडिताशिवाय पार पडला. प्रत्यक्ष लग्नसोहळ्यात नेहमीच्या परंपरांना फाटा देण्यात आला. त्याऐवजी घटनेची प्रस्तावना वाचून दाखवण्यात आली. त्यानुसारच पती-पत्नी म्हणून एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याची शपथ दोघांनी घेतली. बिहार विधानसभेचे माजी अध्यक्ष उदय नारायण चौधरी, फुलवारीशरीफचे आमदार गोपाल रविदास यांच्यासह ग्रामस्थ या अनोख्या विवाह समारंभाचे साक्षीदार ठरले.