उत्तर प्रदेशममध्ये शालेय परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय, नवं शैक्षणिक वर्ष सुरू होणार १ एप्रिलला

पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारनं जाहीर केलाय. परीक्षा न घेताच सर्व विद्यार्थ्याना उत्तीर्ण करण्यात येईल आणि पुढल्या वर्गात प्रवेश दिला जाईल, असं युपी सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. याअगोदर सरकारनं जाहीर केलेल्या निर्णयानुसार २५ आणि २६ मार्च या दिवशी शालेय परीक्षा होणार होत्या. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सरसकट परीक्षाच रद्द कऱण्याचा निर्णय घेतलाय. 

    जगभरात कोरोनानं धुमाकूळ घातल्यामुळे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आयुष्यावर याचा सर्वाधिक परिणाम झालाय. गेल्या वर्षी बंद असलेल्या शाळा या वर्षी टप्प्याटप्प्याने सुरू होत होत्या. मात्र पुन्हा कोरोनाने डोके वर काढायला सुरुवात केल्यामुळे आता पुन्हा अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

    पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारनं जाहीर केलाय. परीक्षा न घेताच सर्व विद्यार्थ्याना उत्तीर्ण करण्यात येईल आणि पुढल्या वर्गात प्रवेश दिला जाईल, असं युपी सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. याअगोदर सरकारनं जाहीर केलेल्या निर्णयानुसार २५ आणि २६ मार्च या दिवशी शालेय परीक्षा होणार होत्या. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सरसकट परीक्षाच रद्द कऱण्याचा निर्णय घेतलाय.

    उत्तर प्रदेशमध्ये नवं शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होईल, अशी घोषणा शालेय शिक्षण विभागानं केलीय. त्यापूर्वी आजपासून (२४ मार्च) उत्तर प्रदेशातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेत. ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवल्या जातील. त्यानंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. दहावी आणि बारावीच्या परीक्षाही पुढं ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र याचं कारण कोरोना हे नसूान त्याच काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. २७ मार्चला उत्तर प्रदेशाच्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. त्यात ही बाब स्पष्ट होण्याची शक्यता आहे.