nitish kumar

पटना : बिहारच्या राजकारणामध्ये नवा इतिहास घडवताना नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी दोन दशकांत सातव्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meet) विधानसभेचे अधिवेशन २३ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंगळवारी झाली, ज्यामध्ये मंत्र्यांच्या विभागांचे विभाजन करण्यात (department allocation announced) आले आहे. पूर्वीप्रमाणेच भाजप आणि जेडीयू (JDU) नेत्यांमध्ये प्रभागाचे विभाजन झाले आहे. नितीशकुमार यांनी आपल्याकडे गृह खाते ठेवले आहे.

कोणाला कोणते मंत्रालय जाणून घ्या

मंगल पांडे : आरोग्य व रस्ते व परिवहन मंत्रालय
अशोक चौधरी: बांधकाम व अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय
मेवालाल चौधरी: शिक्षणमंत्री
विजय कुमार चौधरी: ग्रामविकास व ग्रामीण व्यवहार
संतोष मांझी: लघु व जलसंपदा
तारकिशोर प्रसाद: अर्थ, पर्यावरण, वन, आपत्ती व्यवस्थापन तसंच नगरविकास खात्याचा कार्यभार
शीला कुमारी: परिवहन विभाग
रेणू देवी: महिला कल्याण विभाग, पंचायत राज, सामाजिक न्याय तसंच ईबीसी कल्याण त्याचबरोबर उद्योग विभाग

६९ वर्षीय नितीशकुमार यांनी भाजपचे विधानसभेचे नेते आणि कटिहारचे आमदार तारकिशोर प्रसाद आणि बेतिया आमदार रेणू देवी यांच्यासमवेत शपथ घेतली. दोघांना उपमुख्यमंत्री केले जाईल. राजद-नेतृत्वाखालील पाच पक्षांच्या विरोधी महायुतीने या समारंभावर बहिष्कार टाकला. नितीश यांच्या शपथविधीनंतर, कार्यकाळ सुरू झाला आहे ज्यामध्ये जेडीयू आधीच कमकुवत झाला आहे आणि प्रथमच भाजप आपल्या प्रादेशिक मित्रपक्षापेक्षा मजबूत झाला आहे.

बिहार सरकारमध्ये कोण कोण मंत्री

जेडीयू : विजय चौधरी, विजेंद्र यादव, अशोक चौधरी, मेवालाल चौधरी, शीला मंडल
भाजप : तारकिशोर प्रसाद, रेणु देवी, अमरेंद्र प्रताप सिंह, मंगल पांडे, रामसूरत राय, रामप्रीत पासवान, जीवेश मिश्रा
विकासशील इन्सान पक्ष : मुकेश सहानी
हिंदुस्तान आवाम मोर्चा : संतोष सुमन