आता दंड वैगरे नाही डायरेक्ट FIR दाखल होणार; हायवेवर स्पीडने वाहने चालवणाऱ्यांबाबत कडक कारवाईचा नितीन गडकरींचा इशारा

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार लवकरच गाड्यांच्या वेगाबाबत एक नवीन नियम बनवणार आहे, यामध्ये कोणी वाहतुकीचे नियम तोडताना आढळल्यास त्याच्यावर एफआयआर दाखल होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली(No more direct FIRs will be filed; Nitin Gadkari warns of strict action against speeding drivers on highways).

    गाझियाबाद : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार लवकरच गाड्यांच्या वेगाबाबत एक नवीन नियम बनवणार आहे, यामध्ये कोणी वाहतुकीचे नियम तोडताना आढळल्यास त्याच्यावर एफआयआर दाखल होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली(No more direct FIRs will be filed; Nitin Gadkari warns of strict action against speeding drivers on highways).

    उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील डासना येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावरील वाहतुकीशी संबंधित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी डासना येथील एकात्मिक वाहतूक व्यवस्था नियंत्रण कक्ष इमारत स्थापन करण्यात आली आहे.

    लवकरच महामार्ग आणि एक्स्प्रेस वेवरील वेगाबाबत नवीन नियम करण्यात येणार आहे. वाहतुकीचा नियम कोणी मोडला तर ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड होईल, जे पुरावे बनतील आणि त्याआधारे एफआयआर दाखल होईल असे नितीन गडकरी म्हणाले.

    युरोपियन दर्जाचे रस्ते बनवणार

    पुढील पाच वर्षांत उत्तर प्रदेशातील रस्ते अमेरिकन आणि युरोपियन दर्जाचे बनविले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली. दिल्ली-लखनौ एक्स्प्रेस वे लखनऊ ते कानपूर आणि कानपूर ते गाझियाबादला जोडला जाईल. त्यानंतर तो दिल्लीला जोडला जाईल असे सांगत कानपूर ते लखनौ किंवा लखनौ ते कानपूर अवघ्या 40 मिनिटांत जाता येईल, अशी माहितीही गडकरींनी दिली.