भाजपाने पाच मुख्यमंत्री बदलून काहीही झाले नाही; पंजाबमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

काँग्रेसमध्ये अपमानित झाल्याचा दावा करत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला खरा, मात्र त्यानंतर त्यांनी काँग्रेसलाच आव्हान देण्याची संधीही सोडलेली नाही. काँग्रेसने कुणालाही मुख्यमंत्री करावे, या त्यांच्या वक्तव्यानंतर पंजाबमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांची आणि काँग्रेसची आगामी वाटचाल सोपी नसेल, याची जाणीव कॅप्टन यांनी करुन दिली आहे.

  चंदीगड : काँग्रेसमध्ये अपमानित झाल्याचा दावा करत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला खरा, मात्र त्यानंतर त्यांनी काँग्रेसलाच आव्हान देण्याची संधीही सोडलेली नाही. काँग्रेसने कुणालाही मुख्यमंत्री करावे, या त्यांच्या वक्तव्यानंतर पंजाबमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांची आणि काँग्रेसची आगामी वाटचाल सोपी नसेल, याची जाणीव कॅप्टन यांनी करुन दिली आहे.

  केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपाने गेल्या सहा महिन्यात पाच राज्यांचे मुख्यमंत्र बदलले आहेत. आगामी विधानसभा निवडमुकांना सोमेरे जाण्यापूर्वी रणनीतीचा भाग म्हणून भाजपाने ही खेळी खेळली आहे. मात्र या पाचही राज्यात दिखाव्याच्या विरोधापलिकडे पक्षश्रेष्ठींना आव्हान देण्याचा सूर निघाला नाही, हे विशेष  सर्वच राज्यांमध्ये भाजपा पक्षश्रेष्ठींचा निर्णय शांततेत स्वीकारण्यात आला.

  दुसरीकडे याच प्रकारची खेळी पंजाबमध्ये करण्याच्या प्रयत्न असलेली काँग्रेस मात्र हिट विकेट होताना दिसते आहे. पंजाबमध्ये २०२२ साली विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यात कॅप्टन आणि त्यांच्या गटाची नाराजी ओढवून घेतल्याने आता विधानसभा निवडणुकांत काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे

  कॅप्टन अमरिंदर सिंग यांना २५ आमदारांचे समर्थन

  कॅप्टन अमरिंदर सिंग जेव्हा राजीनामा देण्यासाठी राजभवनावर निघाले, तेव्हा त्यांच्या निवासस्थानी १९ आमदार होते. कमीत कमी २५ आमदार त्यांचासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत काँग्रेसने कुणालाही मुख्यमंत्री केले तरी पक्षातील असंतोष आगामी काळात मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

  कॅप्टननी काँग्रेस सोडली, तर पंजाबचे राजकारण बदलणार

  राजीनाम्यानंतर भविष्यातील पर्याय खुला असल्याचे वक्तव्य कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले आहे. लवकरच सहकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. जर त्यांनी काँग्रेस सोडून दुसरीकडे राजकीय डाव साधण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेसला एका बड्या नेत्याला तर मुकावे लागलेच, पण त्याच बरोबर सहा महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडमुकीत काँग्रेस पक्ष कमकुवत होण्याचीही शक्यता आहे

  भाजपासाठी मोठी संधी

  मरिंदर सिंग यांनी यापूर्वीही भाजपाप्रेम लपवलेले नाही. २०१७ च्या विधानसभा निवडमुकांपूर्वी जेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते, तेव्हाच भाजपात जाण्याची त्यांच्या मनाची तयारी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध आहेत. ते जेव्हाही दिल्लीत जातात, तेव्हा पंतप्रधानांच्या भेटीची वेळ त्यांना सहज मिळते. गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही त्यांच्या गाठीभेठी नेहमीच्याच आहेत. आता कॅप्टन यांच्या राजीनाम्यानंतर या संधीचे रुपांतर भाजपा सोन्यात करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कॅप्टन आत्ताही भाजपा पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात आहेत.

  नव्या मुख्यमंत्र्यांसमोर आव्हानांचा डोंगर

  काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी कुणालाही मुख्यमंत्री करावे, असे आवाहन कॅप्टन यांनी दिले आहे. याचाच अर्थ सा की कॅप्टन य़ांनी त्यांचे २५ सहकाऱ्यांचा गट प्रत्येक पावलावर नव्या मुख्यमंत्र्यांसमोर आव्हाने उभी करणार आहेत. ज्या प्रमाणे अमरिंदर सिंग यांना लक्ष्य करण्यात आले त्याचप्रमाणे नव्या मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य करण्याची संधी सोडली जाणार नाही. काँग्रेस पक्षातील या अंतर्गत कलहाचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर आणि वोट शेअरवरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.