केरळमध्ये ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांमध्ये वाढ, संख्या पोहोचली ५२८ वर

केरळ राज्यातील ओमायक्रॉन (Omicron Patients In Kerala) संक्रमित रुग्णांची संख्या ५२८ झाली आहे. आरोग्य विभागाने (Health Department) याविषयी माहिती दिली आहे.

    तिरुवनंतपुरम : केरळमध्ये (Kerala) शनिवारी ओमायक्रॉनच्या  (Omicron Update) नव्या ४८ रुग्णांची नोंद झाली आहे. या नव्या रुग्णांमुळे आता केरळ राज्यातील ओमायक्रॉन (Omicron Patients In Kerala) संक्रमित रुग्णांची संख्या ५२८ झाली आहे. आरोग्य विभागाने (Health Department) याविषयी माहिती दिली आहे. आरोग्यमंत्री विणा जॉर्ज (Veena George) यांनी सांगितलं की , ४८ नवीन प्रकरणांमधील ३३ जण कोरोनाचा कमी धोका असलेल्या देशातून आलेले आहेत तर २ रुग्ण जास्त कोरोनाबाधित असलेल्या देशांमधून आले आहेत.

    त्यांनी सांगितलं की, ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्याने ९ जण संक्रमित झाले आहेत. तसेच ४ जण दुसऱ्या राज्यांमधून आले आहेत. आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार नव्या संक्रमित रुग्णांमध्ये सर्वाधिक १२ प्रकरणे कोझीकोड जिल्ह्यातील आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, ३ संक्रमित रुग्ण हे तामिळनाडूमधील आहेत. असे सांगण्यात आले आहे की ५२८ प्रकरणांपैकी ३६५ कोरोनाचा कमी धोका असलेल्या देशांमधून तर ९२ जण कोरोनाचा जास्त धोका असलेल्या देशांमधून आले आहेत.