
राजस्थानचे (Rajasthan)मुख्यमंत्री अशोक गेहलोत(ashok gehlot) म्हणाले की, राजस्थान दिवसाचे औचित्य साधून, राज्यातील तुरूंगात बराच काळ शिक्षा भोगत असलेल्या सुमारे १२०० कैद्यांना(1200 prisoners will be free from jail) वेळेआधीच सोडण्यात येईल.
राजस्थान राज्याचा ३० मार्च हा वर्धापन दिन(Rajasthan Day) आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अशोक गेहलोत यांचे सरकार राज्यातील विविध तुरुंगात कैद असलेल्या सुमारे १,२०० कैद्यांची सुटका करणार आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शनिवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या कैद्यांच्या सुटकेचा निर्णय घेतला आहे त्यात अनेकांच्या शिक्षेचा कालावधी संपण्याच्या मार्गावर आहे. तसेच या सोडण्यात येणाऱ्या कैद्यांमध्ये चांगले वर्तन असलेले कैदी,ज्यांना असाध्य आजार आहे असे कैदी आणि वयोवृध्द कैदी यांचा समावेश असल्याचे समजते. तुरुंग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, “राजस्थान दिवसाचे औचित्य साधून, राज्यातील तुरूंगात बराच काळ शिक्षा भोगत असलेल्या सुमारे १२०० कैद्यांना वेळेआधीच सोडण्यात येईल. यामध्ये झालेल्या शिक्षेपैकी बहुतांश शिक्षा पूर्ण झालेले आणि तुरुंगात चांगले वर्तन असलेले कैदी तसेच ज्यांना असाध्य आजार आहे आणि वयोवृध्द कैदी यांचा समावेश अशा लोकांचा यात समावेश आहे.”
राजस्थान दिवस के अवसर पर प्रदेश की जेलों में लम्बे समय से सजा भुगत रहे करीब 1200 बंदियों को समय से पहले रिहा किया जाएगा। इनमें सदाचार पूर्वक अपनी अधिकांश सजा भुगत चुके अथवा गंभीर बीमारियों से ग्रसित एवं वृद्ध बंदी शामिल हैं।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) March 27, 2021
गेहलोत म्हणाले की, “बलात्कार, ऑनर किलिंग, मॉब लिंचिंग, पॉक्सो कायद्यासह २८ वेगवेगळ्या प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांबद्दल शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना कोणताही दिलासा मिळणार नाही.”
कोविड -१९ च्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी ज्या कैद्यांना कर्करोग, एड्स, कुष्ठरोग सारख्या गंभीर आजार आहेत त्यांना सोडले जाऊ शकते. ७० वर्षापेक्षा जास्त वयाचे पुरूष आणि ६५वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या स्त्रिया ज्यांनी झालेल्या शिक्षेपैकी एक तृतीयांश शिक्षा भोगली आहे अशा कैद्यांना वेळेपूर्वीच सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.