जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक हिजबुलचा सदस्य

श्रीनगर येथील शोपियान येथे शनिवारी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या एनकॉन्टरमध्ये ठार झालेल्या दोन अतिरेक्यांपैकी एक जण हिज्बुल मुजाहिद्दीनचा सदस्य आहे. गेल्या आठवड्यात त्याला पाकिस्तानमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण देण्यात आले होते.

    श्रीनगर (Srinagar).  शोपियान येथे शनिवारी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या एनकॉन्टरमध्ये ठार झालेल्या दोन अतिरेक्यांपैकी एक जण हिज्बुल मुजाहिद्दीनचा सदस्य आहे. गेल्या आठवड्यात त्याला पाकि

    स्तानमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण देण्यात आले होते. पोलिस महानिरीक्षक (काश्मीर) विजय कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

    दक्षिण काश्मीरमधील शोपियां येथील वनगाम येथे शनिवारी सायंकाळी सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी हिज्बुल मुजाहिद्दीनचा एक आणि लष्कर-ए-तैयबाचा एक अशा दोन अतिरेक्यांना ठार मारले. मृत अतिरेक्यापैेकी एक शोपियानमधील रहिवासी इनूपुल्ला शेख हा 2018 पासून सक्रिय होता. मागील वर्षी शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानला गेला होता. तो गेल्या आठवड्यात परतला. माहिती सुत्रानुसार तो हिजबुल मुजाहिद्दीनचा सदस्य होता. कुमार म्हणाले की, दुसरा अतिरेकी आदिल मलिक अनंतनागचा रहिवासी होता आणि त्याचा लष्कर-ए-तैयबाशी संबंध होता.

    चकमकीच्या ठिकाणी एक एके-47 रायफल, 1 एम 4 रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. विजय कुमार म्हणाले की, सुरक्षा दलाने दहशतवाद्यांकडून दोन एम 4 रायफल जप्त केल्या आहेत. महानिरीक्षक म्हणाले की, शेख याने पाकिस्तानमधून एम 4 रायफल आणली असावी. या चकमकीत लष्कराचे जवान हवालदार पिंकू कुमार शहीद झाले, तर दुसरा सैनिक जखमी झाला होता. जखमी सैनिकाला लष्कराच्या 92 बेस रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.