पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीडीसी निवडणुकीचा उल्लेख करीत काँग्रेसवर जोरदार टीका केली. दिल्लीत बसलेले काही लोकं मला लोकशाही शिकविण्याचा प्रयत्न करता आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचीच अवहेलनाही करतात. ते पुद्दुचेरीत पंचायत आणि मनपा निवडणुका टाळतात, अशी टीका त्यांनी केली. उल्लेखनीय असे की, काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतात लोकशाहीच नाही केवळ कपोलकल्पित लोकशाही आहे अशी टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही राजकीय पक्षांच्या कथनी आणि करणीत फरक आहे. पुद्दुचेरीत कितीतरी वर्षे निवडणुकाच घेतल्या जात नाही यावरूनच ते लोकशाहीप्रती किती गंभीर आहेत हे दिसून येते असा टोमणा हाणला.

श्रीनगर (Shrinagar).  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीडीसी निवडणुकीचा उल्लेख करीत काँग्रेसवर जोरदार टीका केली. दिल्लीत बसलेले काही लोकं मला लोकशाही शिकविण्याचा प्रयत्न करता आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचीच अवहेलनाही करतात. ते पुद्दुचेरीत पंचायत आणि मनपा निवडणुका टाळतात, अशी टीका त्यांनी केली. उल्लेखनीय असे की, काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतात लोकशाहीच नाही केवळ कपोलकल्पित लोकशाही आहे अशी टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही राजकीय पक्षांच्या कथनी आणि करणीत फरक आहे. पुद्दुचेरीत कितीतरी वर्षे निवडणुकाच घेतल्या जात नाही यावरूनच ते लोकशाहीप्रती किती गंभीर आहेत हे दिसून येते असा टोमणा हाणला.

स्थानिक निवडणुका टाळतात
दिल्लीत काही लोक आहेत, जे नेहमी माझा अपमान करतात तसेच माझा अपमान करतात. मी त्यांना राज्यात झालेल्या डीडीसी निवडणुकांना लोकशाहीचे उदाहरण म्हणून दाखवू इच्छितो. काही राजकीय शक्ती मला लोकशाहीवर भाषण देत आहेत. मात्र त्यांची दुटप्पी भुमिका आणि पोकळपणा पहा. तुम्ही हैराण व्हाल की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही, तिथे जे सरकार आहे, ते स्थानिक निवडणुका टाळत आहे. मात्र, जम्मू-काश्मीरला केंद्र शासित प्रदेश घोषित केल्यानंतर एका वर्षाच्या आतच स्थानिक स्तरावरच्या निवडणुका आयोजित केल्या आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सुकोच्या निर्णयाचा दिला दाखला
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला दिला. सुप्रीम कोर्टाने २०१८ मध्येच पुद्दुचेरीत स्थानिक निवडणुकांबाबत आदेश दिला होता असे ते म्हणाले. परंतु तेथील सरकार मात्र निवडणुका सातत्याने टाळत आहे असे ते म्हणाले. पुद्दुचेरीत कित्येक दशकानंतर २००६ मध्ये स्थानीक निवडणुका झाल्या होत्या. त्यांचा कार्यकाळ २०११ मध्येच संपुष्टात आला आहे असे ते म्हणाले.

म्हणाले, सत्तासुखाचा केला त्याग
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील या निवडणुकांनी हे देखील दाखवून दिले की देशात लोकशाही किती मजबूत आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत पीएम जय सेहत योजनाही सादर केली व दोन लाभार्थींसोबत चर्चाही केली. यावेळी त्यांनी पीडीपीसोबतच्या फारकतीचाही उल्लेख केला. एकेकाळी आम्ही जम्मू काश्मिर सरकारमध्ये एकजूट होते. सत्तेत असलो तरी आम्ही पंचायत निवडणुका घेण्यासाठीच आम्ही सत्तेचे सुख सोडले असे ते म्हणाले. आता केंद्रशासित राज्यात नव्या दशकात नव्या युगाचे नेतृत्व आरंभ झाले असून देशात विश्वास निर्माण झाला आहे असे मोदी म्हणाले.