Terrible The woman's nose and tongue were cut off as she refused to marry; Shocking incident in Rajasthan

अल्पवयीन मुलीच्या पालकांनी ३५ वर्षीय मन्नवर येथील व्यक्तीला १.५५ लाख रुपयांना मुलीची विक्री(Minor Girl Sale Case) केली. त्यातील ५ हजार रुपये आधीच पंचायत समितीच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत.

    धर्मपुरी : गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये(Gujrat) बहिणीच्या नवऱ्यासोबत पळ काढल्याने एका १५ वर्षीय मुलीला(Minor Girl Sell) तिच्या कुटुंबातील सदस्यांनी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील ३५ वर्षीय व्यक्तीला विकल्याचा प्रकार समोर आला आहे. धर्मपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षांची मुलगी बहिणीच्या नवऱ्यासोबत पळून गेल्याची माहिती मिळताच गावात पंचायत बोलवण्यात आली. अल्पवयीन मुलीच्या मोठ्या बहिणीच्या सांगण्यावरून पंचायत बोलवण्यात आली होती. अल्पवयीन मुलीचे आपल्या पतीसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप मोठ्या बहिणीने केला होता. त्यानंतर मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी पंचायतीच्या निर्णयानंतर मन्नवर तालुक्यातील ३५ वर्षीय व्यक्तीला मुलीला विकले. यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनेची चौकशी आणि तपास केल्यावर गुन्हा नोंदविला जाईल, असे सांगितले.

    प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, अल्पवयीन मुलीच्या पालकांनी ३५ वर्षीय मन्नवर येथील व्यक्तीला १.५५ लाख रुपयांना मुलीची विक्री केली. त्यातील ५ हजार रुपये आधीच पंचायत समितीच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत. त्यानंतर जेवणासाठी आणखी पाच हजार रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

    अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना कथितपणे काही रक्कम मिळाली,परंतु या प्रकरणाची चौकशी केली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात अधिक तपास करत असून औपचारिक तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक आदित्य प्रताप सिंह म्हणाले.

    दरम्यान, अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली असून जिल्ह्यातील चाईल्डलाईन संस्थेच्या अधिकाऱ्यांमार्फत समुपदेशन केले जात आहे. “आम्ही गावात गेल्यानंतर त्या मुलीची सुटका केली आहे. मुलीला शिकण्याची इच्छा आहे त्याचवेळी तिला तिच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत राहायचे आहे असा तिचा आग्रह आहे,” असे संस्थेच्या सदस्यांनी सांगितले.