पेटीएम ट्रॅव्‍हलकडून लष्‍करी सेना, विद्यार्थी व ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी इंडिगो, गो एअर, स्‍पाइसजेट व एअर एशियाच्‍या बुकिंग्‍जकरिता खास विमानप्रवास दर सादर

सुलभ बुकिंग सुविधा (Booking Service) देण्‍यासाठी या सवलती १५ टक्‍के ते ५० टक्‍क्‍यांपर्यंतच्‍या रेंजमध्‍ये आहेत आणि अधिक सोयीसुविधेसाठी विद्यार्थी जवळपास १० किलोग्रॅमपर्यंतचे अतिरिक्‍त सामान देखील सोबत घेऊ शकतात. हे दर उपलब्‍ध सामान्‍य दरांच्‍या तुलनेत लक्षणीय सवलतीसह येतात आणि पेटीएम व बँकिंग सेवा प्रदात्यांकडून देण्‍यात येणार्‍या विद्यमान ऑफर्समध्‍ये भर असतील.

  • विशेष दरांसह विद्यार्थी जवळपास १० किलोग्रॅमपर्यंतचे अतिरिक्‍त सामान देखील सोबत घेऊ शकतात

नवी दिल्ली : भारतातील ग्राहक व व्यापार्‍यांसाठीची आघाडीची (1) डिजिटल परिसंस्था पेटीएमने (Paytm) आज लष्‍करी सेना कर्मचारी, विद्यार्थी व ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी विमानप्रवास बुकिंग्‍जवर खास सवलतीच्‍या दरांची घोषणा केली. या सवलती इंडिगो, गो एअर, स्‍पाइसजेट व एअरएशियाच्‍या बुकिंग्‍जवर उपलब्‍ध असतील.

सुलभ बुकिंग सुविधा (Booking Service) देण्‍यासाठी या सवलती १५ टक्‍के ते ५० टक्‍क्‍यांपर्यंतच्‍या रेंजमध्‍ये आहेत आणि अधिक सोयीसुविधेसाठी विद्यार्थी जवळपास १० किलोग्रॅमपर्यंतचे अतिरिक्‍त सामान देखील सोबत घेऊ शकतात. हे दर उपलब्‍ध सामान्‍य दरांच्‍या तुलनेत लक्षणीय सवलतीसह येतात आणि पेटीएम व बँकिंग सेवा प्रदात्यांकडून देण्‍यात येणार्‍या विद्यमान ऑफर्समध्‍ये भर असतील.

पेटीएम युजर्स त्‍यांची माहिती प्रविष्‍ट केल्‍यानंतर विमानसेवा पर्यायांचा सुलभपणे शोध घेऊ शकतात आणि लागू सवलत व ऑफरची माहिती प्राप्‍त करू शकतात.

पेटीएम प्रवक्‍ता म्‍हणाले, ”ट्रॅव्‍हल तिकिटिंग हा आमच्‍यासाठी महत्त्वपूर्ण विभाग आहे आणि आमचा नेहमीच युजर्सना सुलभ बुकिंग सुविधा देण्‍याचा मनसुबा आहे. तसेच आम्‍ही अगदी किफायतशीर दरामध्‍ये त्‍यांच्‍या ट्रिपचे नियोजन करतो. आमच्‍या विमानसेवा सहयोगींसोबत सहयोगाने आम्‍ही लष्‍करी सेना, विद्यार्थी व ज्‍येघ्‍ठ नागरिक अशा सर्व युजर्सना उत्तम सुविधा देतो.”

पेटीएम ॲप युजर्सना विमानसेवा, आंतरशहरीय बस व रेल्‍वे तिकिटे बुक करण्‍याची सुविधा देते. कंपनीने सर्व प्रमुख राष्‍ट्रीय विमानसेवांसोबत सहयोग केला आहे. तसेच कंपनी इंटरनॅशनल एअर ट्रान्‍सपोर्ट असोसिएशन (आयएटीए) मान्‍यताकृत ट्रॅव्‍हल एजंट आहे. कंपनीचे २,००० हून अधिक बस ऑपरेटर्ससोबत थेट संबंध आहेत. व्‍यासपीठ आपल्‍या व्‍यवहारात्‍मक व वर्तनविषयक माहितींचा लाभ घेत पेटीएम ॲपवरील युजर्सना संबंधित प्रवास तिकिट पर्यायांचा सल्‍ला देते. कंपनीने जवळच असलेल्‍या विमानतळाची वैशिष्‍ट्ये, विमानप्रवासासाठी ईएमआय-आधारित कर्ज, पीएनआर कन्‍फर्मेशन स्‍टेटस आणि रेल्‍वेप्रवासासाठी लाइव्‍ह रनिंग स्‍टेटस, तसेच बसेसमध्‍ये कॉन्‍टॅक्‍टलेस तिकिट-खरेदी अशी नवीन उत्‍पादने लाँच करत ग्राहकांच्‍या सोयीसुविधेकरिता ट्रॅव्‍हल तिकिटिंग विभागामध्‍ये नाविन्‍यता आणली आहे.

(1) स्रोत: रेडसीअर मॅनेजमेंट कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडद्वारे तयार करण्यात आलेला “द डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशन ऑफ पेमेंट्स अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस इन इंडिया” या शीर्षकाखालील १५ जुलै, २०२१ या तारखेचा अहवाल.