पंजाबची जनता काँग्रेसवर नाराज; ‘आप’ मारणार मुसंडी

कृषी कायद्यांवरून मतभेद झाल्यामुळे शिअद नेत्या हरसिमर कौर यांनी केंद्रीय पदाचा राजीनामा दिला व एनडीएतून बाहेरही पडल्या. तथापि, सर्व्हेक्षणात सर्वाधिक नुकसान शिअदचेच नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  चंदीगड: कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांवर होणे निश्चित मानले जात आहे. याचा फटका भाजपा आणि शिरोमणी अकाली दलालाच (शीअद) नव्हे तर सत्ताधारी काँग्रेस पक्षालाही बसण्याची शक्यता आहे. या आंदोलनाचा फायदा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (आप) होणार असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात दिसून आले आहे. एबीपी-सीव्होटरने हे सर्व्हेक्षण केले आहे. आजघडीला जर राज्यात निवडणुका झाल्या तर काँग्रेसला सर्वाधिक नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  ३१ जागा गमावण्याची शक्यता

  सर्व्हेक्षणानुसार काँग्रेसला ३१ जागांचे नुकसान होण्या ची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत ७७ जागा पटकावणारा काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकीत ४६ जागांवरच समाधान मानावे लागण्याची शयक्ता आहे. दुसरीकडे, आम आदमी पक्षाला ३४ जागांचा फायदा होण्याची शक्यता असून ही संख्या ५४ वर जाण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत पक्षाला केवळ २० जागाच मिळाल्या होत्या.

  भाजपा-शिअद
  कृषी कायद्यांवरून मतभेद झाल्यामुळे शिअद नेत्या हरसिमर कौर यांनी केंद्रीय पदाचा राजीनामा दिला व एनडीएतून बाहेरही पडल्या. तथापि, सर्व्हेक्षणात सर्वाधिक नुकसान शिअदचेच नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अकाली दलाला गेल्यावेळेप्रमाणे १५जागाच मिळण्याची शक्यता असून भाजपाला मात्र एका जागेचे नुकसान सोसावे लागू शकते.

  सिद्धूंची लोकप्रियता वाढली

  काँग्रेसमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंह यांची लोकप्रियता घसरली आहे तर नवज्योतसिंह सिद्धूंची लोकप्रियता वाढली आहे. केवळ २३ टक्के लोकांनी सिद्धूंच्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे. २६ टक्के लोकांनी दोघांनाही नापसंती व्यक्त केली. तथापि, ४३ टक्के लोकांनी आम आदमी पक्ष राज्यात सरकार स्थापन करू शकतो असे मत व्यक्त केले.

  संभाव्य निकाल

  पक्ष                    २०१७          २०२२
  आप                    २०               ५४
  काँग्रेस                 ७७              ४६
  भाजपा                ३                 ४
  अकाली दल         १५              १५
  अन्य                    २                 ०