हॉटेलमधील सेक्स रॅकेटवर पोलिसांचा छापा; तरुणींसह १२ महिलांची सुटका

नोएडा, बुलंदशहर आणि आजुबाजुच्या भागातून लोक मौजमजा करण्यासाठी येत होते. पोलिसांनी छापा टाकून १२ तरुणी आणि ११ पुरुषांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणींमध्ये तीन ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थिनी आहेत. यावेळी पोलिसांनी हॉटेच्या मालकासह मॅनेजरला अटक केली आहे. तसेच आपत्तीजनक वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

    नोएडा : ग्रेटर नोएडाच्या चीती गावामध्ये एका आलिशान हॉटेलवर शनिवारी पोलिसांनी छापा टाकला. येथे नोएडा, बुलंदशहर आणि आजुबाजुच्या भागातून लोक मौजमजा करण्यासाठी येत होते. पोलिसांनी छापा टाकून १२ तरुणी आणि ११ पुरुषांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणींमध्ये तीन ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थिनी आहेत. यावेळी पोलिसांनी हॉटेच्या मालकासह मॅनेजरला अटक केली आहे. तसेच आपत्तीजनक वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

    शहरापासून दूर असलेल्या या हॉटेलमध्ये हा गोरखधंदा सुरु होता. एसीपी बृजनंदन राय यांनी अटक झालेल्या आरोपींविरोधात सेक्स रॅकेटची गुन्हे दाखल केले आहेत. सोबतच सर्वांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. तरुणींना नोएडाच्या वन स्टॉप सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. पुरुषांची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली जात होती. या गोरखधंद्याल पाठीशी घालणाऱ्या सहा पोलिसांवर देखील कारवाई करण्यात आली आहे.