केरळच्या विकासासाठी एनडीएला सत्तेवर येण्याची संधी द्या, रामदास आठवलेंचे आवाहन

केरळच्या विकासासाठी एलडीएफ आणि युडीएफला नाकारून जनतेने भाजप प्रणित नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स एनडीएला केरळमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी द्यावी,असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले(ramdas athavale appeal in keral) यांनी आज केले.

    कोझिकोड: केरळमध्ये(keral) दर ५ वर्षांनी लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ्रंट आणि काँग्रेस प्रणित यु डी एफ यांना सत्ता मिळत आली आहे. मात्र या काळात काँग्रेस किंवा एलडीएफ ने केरळचा रस्ते विकास ; आर्थिक विकास; मूलभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर असा कोणताही विकास केला नाही.रोजगाराची केरळमध्ये संधी नसल्याने केरळ मधील तरुण दुबई यूएई ; युरोप आदी ठिकणी परदेशात रोगारासाठी गेले आहेत.त्यामुळे केरळच्या विकासासाठी एलडीएफ आणि युडीएफला नाकारून जनतेने भाजप प्रणित नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स एनडीएला केरळमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी द्यावी,असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज केले.

    भाजपचे केरळ राज्य सरचिटणीस एम पी रमेश कोझिकोड(कालिकत) उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या प्रचारसभेत रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.केरळमध्ये सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाने भाजपला पाठिंबा दिला आहे.

    केरळच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एल डी एफ; काँग्रेस प्रणित युडीएफ आणि भाजप प्रणित एनडीए असा तिहेरी मुकाबला होत आहे. त्यामुळे भाजपला अधिक बळ देण्यासाठी आरपीआयने एक ही उमेदवार निवडणुकीत न उतरवता सर्व जागांवर भाजप प्रणित एनडीए ला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप ला केरळ मध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी नक्की मिळणार असून सत्ता आल्यास केरळमध्ये रिपाइंला ही सत्तेत सहभाग मिळेल असा विश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.

    महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांप्रमाणेच महात्मा आयांकाली आणि नारायण गुरू या महान समाज सुधारकांच्या विचारांनुसार केरळमध्ये रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू आहे. केरळमधील २५ टक्के दलित आदिवासींच्या विकासासाठी भाजप प्रणित एनडीएचे सरकार केरळ मध्ये निवडून देणे आवश्यक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतात एनडीए सर्व समाज घटकांना न्याय देऊन विकास साधत आहे.केरळ च्या विकासासाठी जनतेने भाजप प्रणित एनडीए च्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. यावेळी रिपाइं चे राजीव मेनन; नुसरत जहाँ; रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष विजय राजन आदी मान्यवर उपस्थित होते.
    मुंबईत केरळ चे मल्याळम भाषिक नागरिक लाखोंच्या संख्येने राहत असून त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष नेहमी खंबीरपणे उभा राहिला आहे असे  रामदास आठवले यावेळी म्हणाले.